Join us

Animal : रणबीरच्या 'ॲनिमल'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं! अवघ्या सहा दिवसांत केली रेकॉर्डब्रेक कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 12:50 IST

रणबीरचा 'ॲनिमल' बॉक्स ऑफिसवर सुसाट! अवघ्या सहा दिवसांत पार केला ३०० कोटींचा टप्पा

बहुचर्चित 'ॲनिमल' सिनेमा १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमातील डायलॉग, सीन्सची जोरदार चर्चा रंगली आहे. 'ॲनिमल'मधील रणबीरचा अवतार पाहून प्रेक्षकही भारावून गेले आहेत. या सिनेमातील रणबीरच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. जिकडे तिकडे 'ॲनिमल'चे शो हाऊसफूल होताना दिसत आहे.  

'ॲनिमल' या बिग बजेट बॉलिवूड सिनेमात रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट आहे. या सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करायला सुरुवात केली होती. प्रदर्शनाआधीच 'ॲनिमल' सिनेमाने 'ॲडव्हान्स बुकिंगमधून कोटी रुपये कमावले होते. टीझरपासूनच या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सिनेमांचे रेकॉर्ड मोडायला सुरुवात केली. प्रदर्शनानंतर सहा दिवसातंच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 

रणबीरच्या 'ॲनिमल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसला पछाडलं आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी ६३.८ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर वीकेंडलाही या चित्रपटाने दमदार कमाई केली. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार या सिनेमाने सहाव्या दिवशी ३० कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत 'ॲनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३१२.९६ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींचा आकडा पार केला आहे.  

टॅग्स :रणबीर कपूरबॉबी देओलअनिल कपूररश्मिका मंदाना