Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' अभिनेत्यालाही आलाय कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव, Animal मध्ये केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 19:30 IST

एकाने त्याला मध्यरात्री घरी बोलावलं आणि त्यानंतर काय झालं ते वाचा. 

फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा सामना करणं काही नवीन नाही. अनेक कलाकारांना या प्रसंगातून जावं लागलं आहे. 'अॅनिमल' सिनेमात रणबीर कपूरच्या बहिणीच्या नवऱ्याची भूमिका साकारलेला अभिनेता सिद्धांत कर्णिकनेही (Siddhant Karnick)  नुकतंच कास्टिंग काऊचच प्रसंग सांगितला. एकाने त्याला मध्यरात्री घरी बोलावलं आणि त्यानंतर काय झालं ते वाचा. 

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सिद्धांत कर्णिक म्हणाला, "2005 साली घडलेला हा प्रसंग आहे. एका कास्टिंग कोऑर्डिनेटरने मला रात्री १०.३० वाजता घरी बोलावलं. आधी मला ते थोडं विचित्र वाटलं. पण जेव्हा मी घरी गेलो तेव्हा कुटुंबातील सदस्यांचे बरेच फोटो लावले होते. ते पाहून मला जरा सुरक्षित वाटलं. नंतर कोऑर्डिनेटरने फिल्मइंडस्ट्रीतील नॉर्म्सवर बातचीत करायला सुरुवात केली. तेव्हाच त्याने मला एक हिंट दिली की जर करिअरमध्ये काही संधी हव्या असतील तर कॉम्प्रमाइज करावं लागेल. तोवर काम मिळणार नाही."

तो पुढे म्हणाला, " तेव्हा मी खूप लहान होतो. मला या गोष्टींची समज नव्हती. तो बोलता बोलता माझ्याजवळ येऊन बसला. मग मी लगेच इंटरेस्टेड नसल्याचं सांगितलं. यानंतर त्याने मला धमकी दिली. मला दुसरीकडे कुठे काम मिळतं बघतोच असा त्याने इशारा दिला. मी तेव्हा इंडस्ट्रीत कोणाला ओळखत नव्हतो. ना कोणी गाईड ना मेंटॉर. मी तेव्हा न घाबरता स्वत:साठी खंबीरपणे उभा राहिलो म्हणून माझा निभाव लागला."

काही वर्षांनी एका कॉलेजमध्ये मला पाहुणा म्हणून बोलावलं होतं. तिथे तो कास्टिंग कोऑर्डिनेटरही आला होता. माझे गाजलेले टीव्ही शोज पाहून त्याने माझं अभिनंदन केलं. तेव्हा मला कळलं की काही वर्षांपूर्वी झालं ती फक्त एक व्हाइब होती. ते काही रेपिस्ट नाहीत. तुम्ही फक्त त्यांना संधी देऊ नका. यानंतर ते पुन्हा तुमच्या मागे येणार नाहीत. काम मिळवण्यासाठी तुम्ही स्वत:ला बदलू नका."

टॅग्स :सेलिब्रिटीकास्टिंग काऊचबॉलिवूड