'या' व्यक्तिचा आहे अनिल कपूरच्या आयुष्यावर सगळ्यात जास्त प्रभाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2017 17:28 IST
'मुबारकां' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनिल कपूरने एक मोठा खुलासा केला आहे. अनिल कपूर म्हणला माझ्या आयुष्यावर दिगवंत ज्येष्ठ अभिनेते राज ...
'या' व्यक्तिचा आहे अनिल कपूरच्या आयुष्यावर सगळ्यात जास्त प्रभाव
'मुबारकां' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनिल कपूरने एक मोठा खुलासा केला आहे. अनिल कपूर म्हणला माझ्या आयुष्यावर दिगवंत ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांचा खूप मोठा प्रभाव आहे. अर्जुन कपूरने अनिल कपूराला विचारले मनोरंजन जगातून तुझ्या आयुष्यावर सगळ्यात जास्त प्रभाव कोणाचा राहिला आहे. यावर उत्तर देताना अनिल कपूर म्हणाला, ''राज कपूर हे सगळ्यात मोठे कलाकार आणि महान दिग्दर्शक होते.त्यांचे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करणार होते.'' पुढे तो म्हणाला ''त्यांच्या चित्रपटाचे संगीत आणि बॅकग्राऊंड म्युझिक खूपच अनोख होते. ते एक महान फिल्मकार होते ज्यांनी अभिनेत्रींना अत्यंत सुंदरपणे मोठ्या पडद्यावर सादर केले आहे. मला नाही वाटत आणखीन कोणाला हे जमले ज्या नजाकतीने त्यांनी अभिनेत्रींना पडद्याच्या समोर आणले. त्यांनी श्री 420, मेरा नाम जोकर असे एकापेक्षा एक चित्रपट दिले. त्यांचे चित्रपट नेहमीच इतरांपेक्षा वेगळे होते. त्यामुळे या क्षेत्रात माझ्यावर त्यांचा सगळ्यात जास्त प्रभाव पडला आहे.''पुढे बोनी कपूर बदल बोलताना अनिल कपूर म्हणाला आमच्या दोघांमध्ये भावाच्या नात्यापेक्षा मैत्रिचे नाते अधिक आहे. दोघांनी बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात एकत्र केली होती. मी लहानपणी सगळ्यात जास्त खोडकर होतो. बोनी आणि संजय कपूर नेहमी माझ्यामुळे पकडले जायचे. ALSO READ : Must Watch : मुबारकांमधले 'द गोगल साँग' आऊट मुबाराकां चित्रपटात काका-पुतण्याची जोडी झळकणार आहे. अनिल कपूर, अर्जुन कपूरसह इलियाना डिक्रूझ आणि अथिया शेट्टी यांच्यादेखील यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. अनीज बज्मी यांने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 28 जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे.