Join us

अनिल कपूरचा मुबारकन मधला लुक तुम्ही पहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2017 23:21 IST

अनिल कपूरने त्याची वहिनी श्रीदेवीसोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. दिल धडकने दो या चित्रपटात तो रणवीर सिंग सोबत ...

अनिल कपूरने त्याची वहिनी श्रीदेवीसोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. दिल धडकने दो या चित्रपटात तो रणवीर सिंग सोबत झळकला. रणवीर हा अनिलचा भाचा असल्याचे खूपच कमी जणांना माहिती आहे. रणवीर हा अनिलची पत्नी सुनीताच्या बहिणीचा मुलगा आहे. अनिल आता त्याच्या आणखी एका नातलगासोबत चित्रपटात झळकणार आहे.अर्जुन कपूर आणि अनिल कपूर ही काका पुतण्याची जोडी प्रेक्षकांना मुबारकन या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मुबारकन या चित्रपटातील अर्जुनाचा लुक त्याने काही दिवसांपूर्वी शेअर केला होता आणि आता अनिलने त्याचा मुबारकन मधला लुक ट्विटरवर शेअर केला आहे. या चित्रपटात अनिल एका शिखच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. अनिलचा असा लुक पहिल्यांदाच चित्रपटात पाहायला मिळणार आहे. बिवी नंबर वन या चित्रपटात एका गाण्यात केवळ काही सेकंदासाठी तो शिखच्या रूपात दिसला होता.अनिल या चित्रपटात करतार सिंग ही भूमिका साकारणार आहे. त्याने या चित्रपटाचा लुक ट्विटरवर शेअर करताना म्हटले आहे की, कोणताही चित्रपट स्वीकारल्यानंतर त्या चित्रपटाचा पहिला लुक लोकांच्या समोर आणताना मी नेहमीच उत्सुक असतो. करतार सिंगचा लुक माझ्या फॅन्ससाठी शेअर करत आहे.मुबारकन या चित्रपटात अर्जुन कपूर डबल रोलमध्ये असून अर्जुनदेखील एका भूमिकेत शिखच्या रूपात दिसणार आहे. अनिल आणि अर्जुनची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री खूप चांगली आहे. अर्जुन हा अनिलला एक जवळचा मित्र मानतो आणि सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत शेअर करतो. आता या काका पुतण्याची केमिस्ट्री चित्रपटात कशी जुळून आली आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.