Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कपूरच्या वयावरून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मिम्सविषयी हे आहे अनिलचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 14:51 IST

अनिल कपूरच्या वयावरून जोक्स करणारे अनेक मिम्स देखील लोकांनी बनवले होते. अनिल कपूरचे तारुण्य पाहाता अनिल तैमुरसोबत देखील काही वर्षांनी मुख्य भूमिकेत झळकेल असे देखील नेटिझन्सने म्हटले होते. 

ठळक मुद्देमाझ्यावर जो प्रेमाचा आणि मिम्सचा वर्षाव केला जातोय त्यासाठी मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. गुंडे २ हा चित्रपट मी तैमुरसोबत करत आहे हा जोक तर मला खूपच आवडला. गेल्या ३५ वर्षांपासून माझ्या व्यक्तिरेखेच्या मागणीनुसार माझा चित्रपटातील लूक असतो.

अनिल कपूर हा बॉलिवूडमधील चॉकलेट हिरो मानला जातो. अनिलने वयाची साठी पार केली असली तरी तो आजही एखाद्या तरुण मुलासारखाच दिसतो. आजच्या तरुण अभिनेत्यांना लाजवेल अशी त्याच्यात एनर्जी आहे. त्यामुळे अनिल कपूरचे नेहमीच कौतुक केले जाते. त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. 

अनिल कपूर दिशा पटानी, आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत मलंग या चित्रपटात काम करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी करणार आहे. या चित्रपटाविषयी त्याने काही दिवसांपूर्वी ट्विटर अकाऊंटद्वारे त्याच्या चाहत्यांना माहिती दिली होती. त्याने या चित्रपटाच्या टीमसोबत एक फोटो शेअर करून आम्ही मलंगमध्ये एकत्र काम करत आहोत असे लिहिले होते.

अनिलने हा फोटो शेअर केल्यानंतर मात्र एक वेगळीच चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. अनिल कपूर या सगळ्या कलाकारांपेक्षा वयाने खूपच मोठा असला तरी तो या सगळ्यांपेक्षा तरुण दिसत असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे होते. तसेच अनिलच्या वयावरून जोक्स करणारे अनेक मिम्स देखील लोकांनी बनवले होते. अनिल कपूरचे तारुण्य पाहाता अनिल तैमुरसोबत देखील काही वर्षांनी मुख्य भूमिकेत झळकेल असे देखील नेटिझन्सने म्हटले होते. 

 

अनिलच्या वयावरून सोशल मीडियावर मिम्स अनेक दिवसांवरून फिरत होते. पण त्यावर अनिलने मौन राखणेच पसंत केले होते. पण अनिलने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट टाकून या सगळ्यावर त्याची प्रतिक्रिया काय आहे हे लिहिले आहे. अनिलने ट्विटरवर त्याच्या लम्हे, दिल धडकने दो यांसारख्या अनेक चित्रपटातील फोटो पोस्ट करून एक पोस्ट लिहिली आहे. त्याने म्हटले आहे की, माझ्यावर जो प्रेमाचा आणि मिम्सचा वर्षाव केला जातोय त्यासाठी मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. गुंडे २ हा चित्रपट मी तैमुरसोबत करत आहे हा जोक तर मला खूपच आवडला. गेल्या ३५ वर्षांपासून माझ्या व्यक्तिरेखेच्या मागणीनुसार माझा चित्रपटातील लूक असतो. तुमच्याकडे तुम्ही लक्ष देणे सोडता, त्यावेळी तुमचे वय दिसू लागते. पण माझ्याकडे लक्ष न देण्याचा अजून तरी माझा काहीही विचार नाहीये. 

 

टॅग्स :अनिल कपूरतैमुर