एक प्रसंग सांगताना अनिल कपूरने म्हटले की, एका सीनची मी शूटिंग करीत होतो. तेव्हा मला कळाले की, संपूर्ण दिवस शुटिंग केल्यानंतरही दिग्दर्शकांना त्यांच्या मनासारखा एकही शॉट मिळाला नाही. कारण मी बिंधास्तपणे हसू शकत नव्हतो. अनिलने सांगितले की, यातून मला सावरण्यासाठी खूप वेळ लागला. असो, अनिलच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, अनिल कपूर लवकरच ‘फन्ने खां’ आणि ‘रेस-३’ या चित्रपटांमध्ये बघावयास मिळणार आहे. त्याचबरोबर ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ आणि ‘टोटल धमाल’ या चित्रपटांवरही अनिल काम करीत आहे. यावर्षी अनिल कपूरचे बरेचसे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. गेल्या वर्षी (२०१७) अनिलचा एकच ‘मुबारकां’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.}}}} ">.@AnilKapoor ki #Hichki | @HichkiTheFilmpic.twitter.com/2nts7K6Oi5— Yash Raj Films (@yrf) March 17, 2018
अनिल कपूरला सुरुवातीच्या दिवसांमध्ये ‘या’ गोष्टीची वाटायची भीती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 19:58 IST
बॉलिवूडचा यशस्वी अभिनेता म्हणून अनिल कपूरला ओळखले जाते. परंतु सुरुवातीच्या दिवसांमध्ये चित्रपटांमध्ये काम करताना या गोष्टीची त्याला प्रचंड भीती वाटायची.
अनिल कपूरला सुरुवातीच्या दिवसांमध्ये ‘या’ गोष्टीची वाटायची भीती!
अभिनेता अनिल कपूर लवकरच ‘फन्ने खां’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे, मात्र त्याअगोदरच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये इंडस्ट्रीतील आल्यानंतर त्याला वाटत असलेल्या सर्वांत मोठ्या भीतीबद्दल बोलताना दिसत आहे. अभिनेत्री राणी मुखर्जीच्या आगामी ‘हिचकी’ या चित्रिपटाचे चॅलेंज स्वीकारताना त्याने त्याच्या सर्वांत मोठ्या ‘हिचकी’बद्दल (अडचण) सांगितले. अनिल कपूरने म्हटले की, इंडस्ट्रीत आल्यानंतर मला काम करताना असे वाटत होते की, माझे डोळे खूपच छोटे आहेत. जेव्हा मी हसतो तेव्हा माझे डोळे बंद होतात. याच गोष्टीची मला भीती वाटत होती. त्यामुळे कोणताही सीन करताना मी बिंधास्तपणे हसत नव्हतो. यावर्षी त्याचे चार चित्रपट रिलीज होणार आहे. मात्र काही चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. वास्तविक या चारही चित्रपटांमधील त्याचा फर्स्ट लूक अद्यापपर्यंत रिलीज केला गेला नाही. राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’बद्दल सांगायचे झाल्यास हा चित्रपट २३ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या दिग्दर्शनाअंतर्गत बनविण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा एका शिक्षिकेची आहे. यश राज फिल्म्स बॅनरअंतर्गत निर्मित या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, त्यास प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रदर्शनानंतर चित्रपटाला काय प्रतिसाद मिळेल हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.