Join us

​संतापलेली मलायका म्हणते, माझी सुरक्षा माझीच जबाबदारी का?...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 18:24 IST

Malaika Arora writes post on women's safety ; अभिनेत्री मलायका अरोरा हिने एक पोस्ट इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केली आहे. ‘माझी सुरक्षा करणे ही माझीच जबाबदारी आहे का’ असा सवाल तिने या माध्यमातून केला आहे.

बंगळुरू विनयभंग प्रकरणावर चांगलीच चर्चा होत आहे. नेत्यांच्या वक्तव्यावर भडकलेल्या बॉलिवूड स्टार्सच्या सोशल मीडियावरून उमटलेल्या प्रतिक्रिया चांगल्याच व्हायरल होत आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बंगळुरूच्या घटनेचा आधार घेत बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने एक पोस्ट इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केली आहे. ‘माझी सुरक्षा करणे ही माझीच जबाबदारी आहे का’ असा सवाल तिने या माध्यमातून केला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना बंगळुरूमध्ये घडलेल्या घटनांचा संबंध तिने जोडला आहे. अभिनेत्री मलायका अरोरा लिहिते, मी माझ्या मैत्रिंणीसोबत एका मोठ्या शहरातील गर्दीच्या रस्त्यावर पार्टी करायला गेलो, ते तेथे मोठ्या संख्येने आले त्यांनी आमचा विनयभंग केला, अखेर माझी सुरक्षा करणे ही माझीच जबाबदारी आहे. यानंतर आम्ही एका डिस्कोथेकमध्ये गेलो तेथे काही बाऊन्सर्स आले, त्यांनी आम्हाला मारहाण केली, आमचे कपडेही फाडले, पण माझी सुरक्षा क रणे ही माझीच जबाबदारी आहे ना... याप्रकारे तिने आपले अनुभव मांडले आहे. या सोबतच ती लिहते. मी कॉलेजमध्ये असताना पूर्ण कपडे घालून सलवार कमीजमध्ये जात होते. मात्र, ते माझ्याजवळ आले त्यांनी मला घेरले व माझ्या शरीराला स्पर्श केला माझी सुरक्षा ही माझीच जबाबदारी आहे ना...यासोबतच मलायका अरोराने एका सामान्य मुलीला पडणाºया प्रश्नांचा राबताचा या पोस्टमध्ये लावला आहे. या पोस्टच्या शेवटी ती म्हणाली, मी भारतीय नारी आहे. मी देशासाठी पदके जिंकली आहेत. मी सैन्यात आहे, मी एका मोठ्या कंपनीची सीईओ आहे, मी अंतराळात गेली आहे. पण मला या मानसिकतेच्या बाथरूममधून बाहेर पडायचे आहे.मलायका अरोराचा इन्स्टाग्रामवर लिहलेली ही पोस्ट महिला व पुरुषांना विचार करायला लावणारी आहे.  ">http://