रणबीरवर का नाराज कॅट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 14:14 IST
रणबीर कपूरने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना म्हटले होते,‘ मी कधीच माझा ब्रेकअप झाला असे म्हणालो नाही. कॅट माझ्या ...
रणबीरवर का नाराज कॅट?
रणबीर कपूरने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना म्हटले होते,‘ मी कधीच माझा ब्रेकअप झाला असे म्हणालो नाही. कॅट माझ्या फार जवळची आहे. माझ्या आईवडीलांनंतर आयुष्यात तीच माझ्यासाठी प्रेरणादायी होती. मला जास्त याविषयी काहीही बोलायचे नाही.’मात्र, त्याने कॅटरिनाला त्याच्या आयुष्यातील प्रेरणास्थान संबोधले. याचाच तिला भयानक राग आला. कारण, ज्याच्यासाठी तिने तिचे करिअर होल्डवर ठेवले. तिच्याकडे येणाऱ्या अनेक संधी तिने रणबीरसोबतच्या नात्यासाठी सोडून दिल्या.मिसेस रणबीर कपूर बनण्याच्या रेसमध्ये फक्त तिची दमछाक झाली. पण, तिला त्याबदल्यात काय मिळाले.’ म्हणून कॅट रणबीरवर नाराज झाली. रणबीर-कॅटरिना लवकरच ‘जग्गा जासूस’ मध्ये दिसणार आहेत.