परी म्हणते,‘फिट दिसण्यासाठी मी वजन घटवले’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 22:15 IST
परिणीती चोप्राच्या फिटनेस बातम्या तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त चर्चेत आहेत. तिने जेव्हा वजन घटवले तेव्हा जास्त प्रमाणात तिने वजन घटवले ...
परी म्हणते,‘फिट दिसण्यासाठी मी वजन घटवले’
परिणीती चोप्राच्या फिटनेस बातम्या तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त चर्चेत आहेत. तिने जेव्हा वजन घटवले तेव्हा जास्त प्रमाणात तिने वजन घटवले म्हणून तिच्यावर टीका करण्यात आली. बॉडीला शेप देण्याच्या तिच्या या प्रकाराला सर्वांनी ‘इंडियन कर्व्हज’ म्हणून टीकात्मक बोलले. त्यामुळे परी जास्तच चर्चेत आली. सध्याही ती इतर मुलींप्रमाणे सर्व काही खात आहे. तिचा पिझ्झा देखील खात आहे. ती म्हणाली,‘ मी फिट राहण्यासाठी वजन घटवले, के वळ चांगले दिसण्यासाठी म्हणून नाही. ती म्हणते,‘ असा काही नियम नाही की एखाद्या युवतीने क से दिसले पाहिजे. किंवा तिने किती प्रमाणात वजन घटवले पाहिजे. फिट दिसण्यासाठी मी वजन घटवले, चांगले दिसण्यासाठी नव्हे. मला मनातून आवाज आला की, मी वजन घटवले पाहिजे. त्यामुळे मी हे धाडसी पाऊल उचलले. मी फिट नव्हते. माझ्यात स्टॅमिना नव्हता. मला झोपाळल्यासारखेच नेहमी वाटायचे. मी लगेचच थकून जात असे. वजन घटवणे हे माझ्यासाठी सर्वच बाबतीत योग्य होते.’