Join us

- आणि शाहरूख बनला टिंगलीचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 21:15 IST

गत गुरूवारी बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानला अमेरिकेतील विमानतळावर सात वर्षांत तिसºयांदा ताब्यात घेण्यात आले. अमेरिकेच्या लॉस एंजलिस विमानतळावर अमेरिकेच्या ...

गत गुरूवारी बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानला अमेरिकेतील विमानतळावर सात वर्षांत तिसºयांदा ताब्यात घेण्यात आले. अमेरिकेच्या लॉस एंजलिस विमानतळावर अमेरिकेच्या स्थलांतर अधिकाºयांनी किंगखानला  ताब्यात घेतले. यानंतर शाहरूखला अनेक तास चौकशीला सामोरे जावे लागले.  या सर्व प्रकाराबद्दल शाहरूखने  संताप व्यक्त केला . त्यानंतर अमेरिकेचे राजदूत रिच वर्मा  सोशल मीडियावर शाहरुखची माफी मांगताना दिसले. ‘लॉस एंजलिस येथे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही माफी मागतो. पुन्हा असे काही होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. तुझ्या कामाने करोडो लोकांना प्रेरणा मिळतेय’, असे tweet रिच यांनी  केले. यावर शाहरुखनेही ’हरकत नाही सर. तुम्ही व्यक्त केलेल्या चिंतेबाबत आभारी आहे’अशा नम्र शब्दांत त्यांचे आभार मानले. खरे तर हा विषय इथेच संपायला हवा होता. पण विषय इथे संपला तर नवल. या सर्व प्रकारानंतर नेटीजन्स नेहमीप्रमाणे सक्रीय झाले आणि किंगखानबद्दलच्या उपरोधिक tweetsचा जणू पूर आला ‘हॅशटॅग शाहरुख खान’असे टाईप करत अनेकांनी शाहरुख व अमेरिकेमध्ये झालेली त्याची चौकशी यावर आपली मतं मांडायला सुरुवात केली. ‘ डॉन का इंतजार तो 11 मुल्कों ( देशों) की पुलिस कर रही है. लेकिन अमेरिका इन 11 मुल्कों में शामिल नहीं है’,‘अमेरिकेच्या विमानतळावर इमिग्रेशन विभागाच्या अधिकाºयांकडून नेहमी शाहरुख खानलाच का ताब्यात घेतले जाते? तिथल्या अधिकाºयांनी त्याचे सिनेमे पाहायला हवेत’, असे अनेक शाहरूखची खिल्ली उडवणारे tweets पडले.  
}}}}