Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अन् श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूरने हळूच टाकला ‘बॉम्ब गोळा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2017 11:32 IST

श्रीदेवी लाडकी लेक जान्हवी कपूर सध्या तिच्या ग्रॅण्ड बॉलिवूड डेब्यूची तयारी करतेय. अशात सगळ्यांच्या नजरा जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूवर खिळल्या ...

श्रीदेवी लाडकी लेक जान्हवी कपूर सध्या तिच्या ग्रॅण्ड बॉलिवूड डेब्यूची तयारी करतेय. अशात सगळ्यांच्या नजरा जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूवर खिळल्या आहेत. हेच कारण आहे की, जान्हवी सध्या जाम चर्चेत आहे. जिथे जाईल तिथे पापाराझी तिच्या मागावर असतात. गेल्या वर्षभरात जान्हवीने स्वत:त अनेक बदल केलेत. दिवसांगणिक ती अधिक सुंदर दिसू लागली आहे. परफेक्ट फॅशन सेन्स आणि बॉलिवूडसाठी लागणारा आत्मविश्वास असे सगळेच जान्हवीत दिसते. खरे तर बॉलिवूडमध्ये जायचे, हे जान्हवीने फार आधीच ठरवले होते. पण अभिनेत्री बनण्याचा हा निर्णय मॉम श्रीदेवी आणि डॅड बोनी कपूर यांना सांगण्याचा तिचा अंदाज फारच फिल्मी होता. श्रीदेवीच्या मते, जान्हवीचा हा निर्णय कुठल्याही बॉम्ब स्फोटापेक्षा कमी नव्हता.एका मुलाखतीत श्रीदेवी याबद्दल बोलली. तिने तो सगळा किस्सा ऐकवला. तिने सांगितले की, एकदिवस कुणीतरी जान्हवीला तुला पुढे काय व्हायचेय, असा प्रश्न विचारला. मी बाजूलाच बसले होते. यावर जान्हवीने अगदी शांतपणे उत्तर दिले. मला डॉक्टर व्हायचेय. पण रिअर लाईफमध्ये नाही तर चित्रपटात मला डॉक्टर व्हायचेय. जान्हवीचे हे उत्तर मला अगदीच अनपेक्षित होते. हॅलो, तू काय बोलतेय? असे म्हणून तिच्या या उत्तरावर मी जोर जोरात हसायला लागले. एकंदर काय तर मला अभिनेत्रीच बनायचेय, हे जान्हवीने  आधीच ठरवले होते. पण तिचा हा निर्णय तिने कधीच मोकळेपणाने बोलून दाखवला नाही. तिने हळूच बॉम्ब फोडला. मी हा निर्णय बोनीला सांगितला आणि आम्ही दोघांनीही डोक्यावर हात मारून घेतला. यानंतर बराच वेळ मी आणि बोनी नुसते हसत होतो. आम्ही जान्हवीचा निर्णय शांतपणे घेतला. आता बघुयात, तिच्या नशीबात पुढे काय लिहिलेय.ALSO READ : लेकीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल अखेर बोलली श्रीदेवी!