रणवीर सिंग लवकरच ‘सिम्बा’ या चित्रपटात एका भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे़ या चित्रपटासाठी रणवीरने बरेच शरीर कमावलेय. या चित्रपटाच्यानिमित्ताने रणवीर प्रथमच दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत काम करतोय. चित्रपटाच्या शूटींगचे फर्स्ट शेड्यूल अलीकडेच संपले. यानंतर सलमान मुंबईत परतला. गुरुवारी संध्याकाळी रणवीर वांद्रयातील एका जिमबाहेर दिसला आणि केवळ दिसलाच नाही तर मीडियासोबत त्याने बरीच मौजमस्ती केली. मीडियाच्या फोटोग्राफर्सला तो अनेक बॉडी पोज देताना दिसला. जिमच्या बाहेरचं त्याने फोटोशूट केले.
‘गली ब्वॉय’ पूर्ण होताच रणवीर पुन्हा मस्कुलर अवतारात दिसतोय. ‘सिम्बा’साठी त्याने शरीर कमावलेय.
‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंगसोबत सैफ अली खानही प्रमुख भूमिकेत आहे. येत्या २८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.