... आणि सलमान खानने त्याच्या ९१ वर्षांच्या फॅनची केली निराशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 14:40 IST
सलमान खानला आज बॉलिवूडमधी दबंग खान म्हटले जाते. सलमानचे चित्रपट म्हटले की, ते बॉक्स ऑफिसवर हिट ठरणारच असे त्याच्या ...
... आणि सलमान खानने त्याच्या ९१ वर्षांच्या फॅनची केली निराशा
सलमान खानला आज बॉलिवूडमधी दबंग खान म्हटले जाते. सलमानचे चित्रपट म्हटले की, ते बॉक्स ऑफिसवर हिट ठरणारच असे त्याच्या फॅन्सचे म्हणणे असते. त्याच्या अनेक चित्रपटांनी आजवर ३०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. बॉलिवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी आज त्याला मानले जाते. सलमानचे फॅन फॉलॉव्हिंग हे प्रचंड असून लहानांपासून वृद्धापर्यंत सगळेच त्याचे फॅन आहेत. त्यामुळे आपल्या या लाडक्या सलमानची एक झलक तरी पाहायला मिळावी अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा असते. सलमान वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहातो. त्याच्या घराच्या समोर नेहमीच त्याचे चाहते गर्दी करतात. सलमान काही मिनिटांसाठी तरी त्याच्या घराच्या गॅलरीत येईल आणि आपल्या चाहत्यांना हात दाखवेल असे त्यांना वाटत असते.सलमान नुकताच पिंपरीला गेला होता. सलमान पिंपरीला येणार हे कळताच त्याच्या चाहत्यांनी तिथे प्रचंड गर्दी केली होती. सलमानला आपल्याला पाहाता येईल, मोठ्या पडद्यावर अतिशय हँडसम दिसणारा आपला आवडता हिरो खऱ्या आयुष्यात कसा दिसतो हे पाहायला मिळेल असे त्याच्या चाहत्यांना वाटले होते. त्यामुळे त्याचे चाहते कित्येक तास त्याची वाट पाहात पिंपरीच्या रस्त्यांवर उभे राहिले होते. सलमान पिंपरी येथील एका प्रसिद्ध दागिन्यांच्या शोरूमचे उद्घाटन करण्यासाठी तिथे जाणार होता. सलमान पाच वाजता येणार आहे असे त्याच्या चाहत्यांना कळल्यामुळे त्यांनी तीन-चार वाजल्यापासूनच या दुकानाच्या जवळपास गर्दी करायला सुरुवात केली होती. पण सलमान तब्बल चार तास उशिरा म्हणजेच रात्री नऊ वाजता तिथे पोहोचला आणि तेही तिथे केवळ दहा मिनिटेच थांबला. त्याने त्याच्या चाहत्यांना हॅलो, नमस्ते वगैरे केले आणि या दुकानाचे उद्घाटन न करताच तो निघून गेला. या सगळ्यामुळे त्याच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. या गर्दीत एक ९१ वर्षांच्या आजीबाई देखील होत्या. त्या सलमानच्या खूप मोठ्या फॅन आहेत. त्या जवळजवळ तीन-चार वाजल्यापासून गर्दीत उभ्या राहून सलमानच्या येण्याची वाट पाहात होत्या. पण सलमान केवळ दहा मिनिटांतच निघून गेला असल्यामुळे त्यांना सलमानला नीट पाहाता देखील आले नाही. त्यामुळे त्यांची प्रचंड निराशा झाली. Also Read : जाणून घ्या कसे दिसते सलमान खानचे गॅलॅक्सी अपार्टमेंटमधील वन बीएचके घर