Join us  

बहिणीच्या मेहंदी फंक्शनमध्ये सिगारेट ओढत होती अभिनेत्री अनन्या, आता होतेय ट्रोल; Photo व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 11:07 AM

बहिणीच्या मेहेंदी सेरेमनीतील अनन्याचा फोटो व्हायरल.

बॉलिवुड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिची चुलत बहिण अलाना पांडे (Alanna Panday) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दोन दिवसांपासून अलानाच्या प्रिवेडींग फंक्शन्सला सुरुवात झाली आहे. काल पार पडलेल्या मेहेंदी सेरेमनीत अनन्याचा एक फोटो व्हायरल झाला असून नेटकरी अनन्याला ट्रोलही करत आहेत. या फोटोत अभिनेत्री सिगारेट ओढताना दिसत असल्याने चाहते नाराज झालेत.

अलाना पांडे ही चंकी पांडेची (Chunkey Panday) पुतणी आहे. काल पार पडलेल्या मेहेंदी सेरेमनीसाठी अनन्याचं संपू्र्ण कुटुंब फंक्शनस्थळी दाखल झालं. यावेळी अनन्याने फिक्या गुलाबी रंगाचा स्कर्ट आणि ऑफ शोल्डर ब्लाऊज घातला होता. तर यावर तिने न्यूड मेकअप केला होता. यामध्ये ती खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत होती. तिच्या या लुकचं कौतुक होत असतानाच अनन्याचा आणखी एक फोटो व्हायरल झाला आणि चाहत्यांनी अभिनेत्रीला ट्रोल करायला सुरुवात केली.

एका युझरने ट्विटरवर अनन्याचा सिगारेट ओढतानाचा फोटो ट्वीट केला आहे. यात त्याने लिहिले, 'अनन्या स्मोक (Smoke) करत असेल असं वाटलं नव्हतं. हे नेपो किड्स एकीकडे फिट राहण्याचे सल्ले देतात ते किती खोटं आहे.'

अनन्याच्या बहिणीचं मेहंदी फंक्शन अभिनेता सोहेल खानच्या घरी पार पडलं. कारण चंकी पांडेचा भाऊ आणि सोहेल खान हे खूप चांगले मित्र आहेत. मेहंदी सोहळ्यासाठी  बॉबी देओल, अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप, सलमान खानची संपूर्ण फॅमिली सहभागी झाली होती.

अनन्या पांडे सध्या आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत (Aditya Roy Kapoor) तिचं नाव जोडलं जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये दोघांनी सोबत रॅम्प वॉक केला. तेव्हा त्यांच्या केमिस्ट्रीने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं.

टॅग्स :अनन्या पांडेव्हायरल फोटोज्सोशल मीडियाट्रोल