Join us  

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमुळे दीपिका झाली ट्रोल; प्रेग्नंट असतानाही केला डान्स परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 1:14 PM

Deepika padukone: दीपिका दोन महिन्यांची प्रेग्नंट असतानाही तिने डान्स परफॉर्मन्स केला. ज्यामुळे तिला ट्रोल व्हावं लागलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (ranveer singh) यांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. दीपिका प्रेग्नंट असून लवकरच त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. दीपिकाने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ती आई होणार असल्याचं जाहीर केलं होतं. यामध्येच सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. ज्यामुळे ती ट्रोल झाली आहे.

सध्या गुजरातमधील जामनगर येथे अनंत अंबानीचे प्री-वेडिंग कार्यक्रम सुरु आहेत. या कार्यक्रमात देशविदेशातील अनेक दिग्गज व्यक्ती हजेरी लावत आहेत. यात बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे अनेक बॉलिवूड कलाकारांनी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात परफॉर्म केलं. यात दीपिका आणि रणवीर यांनीही डान्स परफॉर्मन्स केला. प्रेग्नंट असताना दीपिका केलेला डान्स पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच तिला ट्रोलही केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच दीपिकाने तिच्या प्रेग्नंसीविषयी गोड बातमी चाहत्यांना दिली. आणि, त्यानंतर ती प्रेग्नंट असताना थेट स्टेजवर डान्स करताना दिली. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.  अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये दीपिका-रणवीरने गल्लां गुडियां या गाण्यावर डान्स केला. यावेळी दीपिकाने रणवीरची सिग्नेचर स्टेप फॉलो करताना दिसून आली.

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

ही दोन महिन्यांची प्रेग्नंट आहे, असं एका युजरने म्हटलं आहे. तर, पैशांपुढे यांना यांच्या जीवाचीही काळजी नाही, असं अन्य एकाने म्हटलं आहे. तर, पैशांची काहीही कमतरता नसतानाही ही प्रेग्नंसीमध्ये डान्स करतीये, पैसा माणसाकडून काय काय करुन घेतो, असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ती आई होणार असल्याचं जाहीर केलं होतं. सप्टेंबर २०२४ मध्ये दीपिका-रणवीर त्यांच्या बाळाचं स्वागत करणार आहेत. त्याची ही पोस्ट पाहिल्यावर अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. मात्र, आता तिचा डान्स पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगबॉलिवूडअनंत अंबानी