Join us  

मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस आणि लेक दिविजाचा ग्लॅमरस लूक चर्चेत, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 3:52 PM

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची प्री वेडिंग सोहळा गुजरातच्या जामनगर येथे भव्य पद्धतीने पार पडला.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची प्री वेडिंग सोहळा गुजरातच्या जामनगर येथे भव्य पद्धतीने पार पडला. त्यांचा विवाहपूर्व सोहळा १ ते ३ मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगर येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात बॉलिवूडसेलिब्रिटी, क्रिकेटर्स, जगभरातील बिझनेस टायकून यासह राजकीय दिग्गजही गुजरातमध्ये अवतरले होते. या प्री-वेडिंग सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व त्यांची मुलगी दिविजा फडणवीस या सहभागी झाल्या होत्या. 

रविवारी कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर अमृता व दिविजा या जामनगरहून परत येताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या. यावेळी  अमृता व दिविजा यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अमृता यांनी लाँग प्रिंटेड ड्रेस परिधान केल्याचं दिसून आलं. तर दिविजा ही पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. दोघींनीही हलका मेकअप लूक केला होता. या माय-लेक अगदी सुंदर दिसत होत्या. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

यापुर्वी अमृता यांचा हॉलिवूडची पॉप सिंगर रिहानासोबतचा फोटो समोर आला होता. अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये रिहानाने परफॉर्म केलं होतं. यावेळी  अमृता फडणवीस यांनीही रिहानासोबतचा फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन केला होता. कॅप्शनमध्ये "Musical Inspiration #rihanna असे म्हणत अमृता यांनी म्युझिक क्षेत्रासाठी रिहाना प्रेरणास्थान असल्याचं म्हटलं. 

अमृता फडणवीस या बँकर आहेत. मात्र त्यांना गायनाची प्रचंड आवड आहे. याआधीही त्यांचे म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी देखील अनेक भक्तीपर गीते गायली आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहलेलं आणि अमृता फडणवीसांनी गायलेलं 'राम भजन'  प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याला सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. 

टॅग्स :अमृता फडणवीससेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा