Join us

अनंत-राधिकाच्या हळदी समारंभात साराचा गुजराती तडका; कलरफुल लेहेंग्यामध्ये खुललं सौंदर्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 14:15 IST

रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरामध्ये लगीनघाई सुरू आहे.

Anant Ambani and Radhika Marchant Wedding :  रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरामध्ये लगीनघाई सुरू आहे. मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट येत्या १२ जुलै रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. या शाही लग्न सोहळ्याला परदेशी पाहुण्यांची रेलचेल पाहायला मिळते आहे. लग्नासाठी मुंबईतील अँटिलिया निवास्थान सजलं आहे. सध्या सोशल मीडियावर या शाही विवाह सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चा चालू आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमामध्ये बॉलिवूड कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील मंडळींनीही हजेरी लावली. दरम्यान,अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात कलाकारांचा स्टाईलिश अंदाज पाहायला मिळाला. एकापेक्षा एक आकर्षक कपडे परिधान करून ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत येत आहे. त्यातच बॉलिवूडची चुलबुली गर्ल सारा अली खानने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. 

८ जुलै या दिवशी अनंत अंबानी आणि राधिका यांचा हळदी समारंभ संपन्न झाला. त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांनी चार चॉंद लावले.  या कार्यक्रमात अभिनेत्री सारा अली खानच्या नव्या लूकने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. अनंत-राधिका यांच्या हळदी समारंभात साराने कलरफुल लेहंगा परिधान केला होता. आपल्या ग्लॅमरस लूकमुळे सारा लाईमलाईटमध्ये आली. अभिनेत्रीचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले आहेत. 

गुजराती पेहराव, लो नेकलाईन चोळी तसेच गळ्यात चोकर नेकलेस अशा अंदाजात साराने या फंक्शनला हजेरी लावली. या मल्टिकलर लेहंग्यामध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे. बॅकलेस चोळी मध्ये सारा तिची कर्व्ही फिगर प्लॉन्ट करताना दिसून आली. अभिनेत्रीच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :सारा अली खानमुकेश अंबानीअनंत अंबानीबॉलिवूडसेलिब्रिटी