Join us

​अमायरा पडली प्रेमात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 17:03 IST

बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूर सध्या जयपूरमध्ये आहे. जयपुरमध्ये आपल्या पहिल्या वहिल्या ‘कुंग फू योगा’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या शूटींगमध्ये ती ...

बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूर सध्या जयपूरमध्ये आहे. जयपुरमध्ये आपल्या पहिल्या वहिल्या ‘कुंग फू योगा’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या शूटींगमध्ये ती व्यस्त आहे. या चित्रपटात जॅकी चॅन व सोनू सूद यांच्या मुख्य भूमिका आहेत...आता तुम्ही म्हणाल, आम्ही काय हे चित्रपटाबद्दल काय सांगत बसलोयं..खरे तर अमायरा कुणाच्या प्रेमात पडली हे ऐकण्यात तुम्हाला रस आहे. तेव्हा आम्ही अधिक ताणून धरत नाही. अमायरा प्रेमात पडलीयं, हे खरं आहे. ही व्यक्ति नसून प्राणी आहे. होय, अमायरा चित्रपटात काम करणाºया एका हत्तीवर अमायराचा जीव जडला आहे. या हत्तीला ती सतत जपते, त्याची काळजी घेते आहे. अमायरा सांगते, मी हत्तीवर कधीही बसलेली नव्हते. मात्र सेटवर मला हत्तीवर बसायला मिळाले. मी पशूप्रेमी आहे. त्यामुळे मी सेटवरच्या या गजराजांची विशेष काळजी घेते. त्याला केळी खाऊ घालणे, त्याला पाणी पाजणे, मज्जा येते. त्याच्यासोबत खेळतांना जाम आनंद येतो.