एमी जॅक्सनचा मोबाइल हॅक; लीक केले पर्सनल फोटोज्
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 12:23 IST
मॉडल तथा अभिनेत्री एमी जॅक्सन हिचा मोबाइल हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हॅकरने तिच्या मोबाइलमधील काही पर्सनल फोटोज् ...
एमी जॅक्सनचा मोबाइल हॅक; लीक केले पर्सनल फोटोज्
मॉडल तथा अभिनेत्री एमी जॅक्सन हिचा मोबाइल हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हॅकरने तिच्या मोबाइलमधील काही पर्सनल फोटोज् इंटरनेटवर लीक केल्याने ही बाब समोर आली असून, यामुळे एमी चांगलीच संतापली आहे. लंडन ते चेन्नई जाण्यासाठी ती मुंबई येथे कनेक्टिंग फ्लाइट बुक करायला गेली होती. यावेळी ती मुंबईतील एका मोबाइल स्टोअरमध्ये गेली होती. या दरम्यानच तिचा मोबाइल हॅक झाला असावा असा संशय तिला आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एमीने सांगितले की, जेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला तेव्हा मला धक्काच बसला. कारण दूर्लक्ष करावे असे हे प्रकरण नसून, याचा सखोल तपास व्हायला हवा. यासर्व प्रकरणाबाबत मी लंडन येथील सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करणार असून, जोपर्यंत संबंधित हॅकरला शिक्षा होत नाही, तोपर्यंत याप्रकरणाचा पाठपुरावा करत राहणार आहे. एमी वनीता फिल्म अवॉर्डसमध्ये परफॉर्म करण्यासाठी केरळला आली होती. लवकरच ती सुपरस्टार रजनीकांत याच्याबरोबर एका सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तसेच एमी रजनीकांतसोबत सायंस फिक्शन ‘२.०’ या सिनेमात काम करीत आहे. सिनेमाचे बजेट ४०० कोटी रुपये आहे, जवळपास ९० टक्के शूटिंगही पुर्ण झाली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शंकर यांनी केले आहे. एमी जॅक्सन तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘एक दीवाना था’ या सिनेमातून केली होती. मात्र तिला खरी ओळख अक्षय कुमार याच्या ‘सिंह इज ब्लिंग’ या सिनेमातून मिळाली. या सिनेमात ती गॅँगस्टरची मुलगी सारा राणा याच्या भूमिकेत झळकली होती. या सिनेमात एमी बरोबर अभिनेत्री लारा दत्ताचीही महत्त्वपुर्ण भूमिका होती. अक्षय आणि एमीची जोडी प्रेक्षकांना जबरदस्त भावली होती. हिंदी सिनेमांव्यतिरिक्त एमी तामिळ आणि तेलगू सिनेमांमध्येही झळकली आहे. एमीचा आगामी ‘२.०’ हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलगू’ या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.