Join us

भाईच्या गालावर अमृताचा ‘चुम्मा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 10:12 IST

भाऊ-बहीणीच्या अतुट प्रेमाचा ‘रक्षाबंधनाचा सण’ नुकताच साजरा झाला. बॉलीवूडमध्येही रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सलमान खान आणि ...

भाऊ-बहीणीच्या अतुट प्रेमाचा ‘रक्षाबंधनाचा सण’ नुकताच साजरा झाला. बॉलीवूडमध्येही रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांनीही हा सण उत्साहात साजरा केला.या सणावेळी संपूर्ण खान कुटुंबीय सोहेल खान, अर्पिता खान शर्मा, अल्विरा अग्निहोत्री आणि अमृता अरोरा हे सर्वजण त्याच्या वांद्रे येथील घरी जमले होते. अर्पिताने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.यात एका फोटोत अमृता अरोरा भाई सलमान खानच्या गालावर ‘चुम्मा’ देताना दिसत आहे. ती यावेळी अरबाज खानला मिस करते आहे असे तिने कॅप्शन दिले आहे.