Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : लॉकडाऊनमुळे पती सोबत अमृता रावने लाईव्ह चॅटमध्ये केले चक्क बाळाचं बारसं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 19:07 IST

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

जगभरात कोरोनाने थैमान घातले असून जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे भारतात 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000 वर पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले.लॉकडाऊनमध्ये सर्वच जण घरात आहे. तर अनेकांना वर्क फ्रॉम करावं लागत आहे. बॉलिवूड कलाकारांनी घरात राहणंच पसंत केले आहे.

अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पती अनमोलने एकत्र लाईव्ह चॅट केले.  ऐवढेच नाही तर जयपूरमधील आपल्या एक चाहत्याच्या मुलीचे नामकरण देखील केले. जयपूरमधील टायगरच्या मुलीच्या बारशाला लॉकडाऊनमुळे कुणी येऊ शकले नाही म्हणून त्याने अमृता आणि अनमोलला बारसे करण्याची विनंती केली. चाहत्याच्या विनंतीला मान देत अमृता या गोंडस कन्येचे देविका असे नामकरण केले. सध्या अमृता आणि अनमोलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.   

 

 

टॅग्स :अमृता राव