Join us

शाहरूख अम्मीच्या आठवणीने व्याकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 22:22 IST

आज १५ एप्रिलचा दिवस किंगखान शाहरूख खान याच्यासाठी महत्त्वपूर्ण होता, असे सांगितले तर तुम्ही म्हणाल, आज ‘फॅन’ रिलीज झाला ...

आज १५ एप्रिलचा दिवस किंगखान शाहरूख खान याच्यासाठी महत्त्वपूर्ण होता, असे सांगितले तर तुम्ही म्हणाल, आज ‘फॅन’ रिलीज झाला म्हटल्यावर आजचा दिवस महत्त्वाचा असेलच. पण तसे नाही. १५एप्रिल ही तारीख शाहरूख कधीही विसरू शकत नाही. याच तारखेला शाहरूखच्या अम्मीने जगाचा निरोप घेतला होता. आज शाहरूखच्या अम्मी फातीमा खान यांचा २५ वा स्मृतीदिन . आजच्या दिवशी शाहरूख भावूक होतो. त्याच्या भावना त्याला रोखता येत नाही. याच भावनेच्या भरात शाहरूखने  अम्मीसाठी अतिशय भावूक करणारा मॅसेज टिष्ट्वटरवर टाकला आहे.  

(15April) I loved it when my mom smiled. Her smile always hugged me.Every yr this day I talk to her & make her smile

शाहरूख नेहमी ‘मम्माज बॉय’ होता. १९९१ मध्ये शाहरूखच्या अम्मींचे निधन  झाले होते. त्यांच्या निधनाने शाहरूखची मोठी बहीण डिप्रेशनमध्ये गेली होती. यानंतर शाहरूखने तिची व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.