Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंबानींच्या ‘गणेश पार्टी’त असा होता बॉलिवूड सेलिब्रिटींचा थाट! दीपिका-रणवीरची ‘कपल एन्ट्री’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 11:15 IST

काल शुक्रवारी बॉलिवूडचे सगळे सेलिब्रिटी मुकेश अंबानींच्या घरी पोहोचले. निमित्त होते, गणेश स्थापनेचे. होय, मुकेश अंबानी यांच्या घरी, बाप्पाची ...

काल शुक्रवारी बॉलिवूडचे सगळे सेलिब्रिटी मुकेश अंबानींच्या घरी पोहोचले. निमित्त होते, गणेश स्थापनेचे. होय, मुकेश अंबानी यांच्या घरी, बाप्पाची स्थापना झाली आणि मग बॉलिवूडचे दिग्गज बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान, बॉलिवूडचा परफेक्शनस्टि आमिर खान व त्याची पत्नी किरण राव, क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर व त्याची पत्नी अंजली असे सगळे या गणेश पार्टीला पोहोचले.पण या गणेश पार्टीत सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र काय होते तर बॉलिवूडच्या रिअल लाईफ कपलची ग्रॅण्ड एन्ट्री. होय, दीपिका पादुकोण व रणवीर सिंह या रिअल लाईफ कपलने या पार्टीत एकत्र एन्ट्री घेतली. याशिवाय टायगर श्रॉफ व त्याची गर्लफ्रेन्ड दिशा पटनी हे लव्हबर्ड्स सुद्धा पार्टीत एकत्र आलेत.गोल्डन रंगाच्या साडीत दीपिका यावेळी प्रचंड सुंदर दिसत होती. रणवीरने ग्रे रंगाचा कुर्ता कॅरी केला होता. रणवीरसोबत दीपिकाची कळी चांगलीच खुलली होती.टायगर व दिशा यांचा लूकही बघण्यासारखा होता. पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिशा कमालीची सुंदर दिसत होती.पिवळ्या रंगाचा लाचा परिधान केलेली जॅकलिन फर्नांडिस या पार्टीत सिद्धार्थ मल्होत्रासोबत पोहोचली. सध्या सिद्धार्थ व जॅकलिनच्या लिंकअपच्या बातम्या आहेत. कालच या दोघांचा ‘अ जेंटलमॅन’ हा चित्रपट रिलीज झाला.श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान यांचा या पार्टीतील टॅड्रिशनल लूकही बघण्यासारखा होता.आमिर खान व त्याची पत्नी किरण राव  हे कपलही या पार्टीत पोहोचले. मुलगा आझादसोबत त्यांनी अशी पोझ दिली.