Join us

अमिताभ यांनी शेअर केला आजी-नातीचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 18:16 IST

कलाकारातही एक लहान मुल दडलेलं असतं. ते कधीकधी त्यांच्या वागणुकीतून बाहेर डोकावत असतं. बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचंही तसंच ...

कलाकारातही एक लहान मुल दडलेलं असतं. ते कधीकधी त्यांच्या वागणुकीतून बाहेर डोकावत असतं. बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचंही तसंच आहे. बिग बी हे अभिनयाचे शहंनशाह असले तरीही नात नव्या समोर आली की ते अगदी लहान मुलांप्रमाणे वागतात. तिच्यासोबत त्यांनी आत्तापर्यंत अनेक फोटो, सेल्फी शेअर केले आहेत. ते तिच्यासोबत फोटो काढून ते लगेचच सोशल मीडियावर शेअर करत असतात.नुकताच त्यांनी एक फोटो शेअर केला असून, त्यात नव्या नंदा ही तिची आजी जया बच्चन हिच्यासोबत दिसत आहे. हा फोटो त्यांनी घरी केलेल्या ख्रिसमसचा असल्याचे ‘बिग बीं’नी शेअर केले आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन हे न्यू ईअरच्या सेलिब्रेशनसाठी दुबईला गेले आहेत. त्यामुळे नव्या नवेली नंदा आणि अगस्त्या नंदा हे नातवंडं त्यांच्या आजी-आजोबांसोबत ख्रिसमस तसेच न्यू ईअरचे प्लॅनिंग करत आहेत.