‘कबाली’च्या हिंदी रिमेकमध्ये अमिताभ??
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 21:22 IST
मेगास्टार रजनीकांत यांच्या ‘कबाली’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले. भारतातल्या जवळपास १२ हजार चित्रपट गृह, अमेरिका, लंडनपासून ...
‘कबाली’च्या हिंदी रिमेकमध्ये अमिताभ??
मेगास्टार रजनीकांत यांच्या ‘कबाली’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले. भारतातल्या जवळपास १२ हजार चित्रपट गृह, अमेरिका, लंडनपासून मलेशियापर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. पहिल्याच दिवशी चित्रपटाचे २५० कोटींचा गल्ला जमवल्याची खबर आहे.या अभूतपूर्व यशानंतर आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर या रिमेकमध्ये बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन असण्याची चर्चा आहे. ‘कबाली’ हिंदीसह अनेक भाषांत डब करण्यात आला आहे. पण रजनीकांत यांचे हिंदीत डब चित्रपट अपेक्षित यश मिळत नाही, हा पूर्वानुभव आहे. त्यामुळेच ‘कबाली’ हिंदी रिमेक येणार आहे आणि यात अमिताभ रजनीकांतची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. आता ही चर्चा सत्यात उतरते की नाही, ते बघूच.. रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांनी ‘अंधा कानून’, ‘गिरफ्तार’, ‘हम’ यांसारख्या चित्रपटातून एकत्र काम केले आहे.