Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आले 54 जण, 28 जणांची झाली कोरोना टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 10:57 IST

अभिषेक बच्चनसोबत वेबसीरिज ‘ब्रीद..’ मधील सहकलाकार अभिनेता अमित साधनेही कोरोनाची टेस्ट करणार आहे.

बच्चन फॅमिली कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांची देखील कोरोना टेस्ट होणार आहे. राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार बीएमसीने बच्चन कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या  54 जणांची लिस्ट तयार केली आहे. ज्यापैकी 28 लोकांची सॅपल देखील घेण्यात आले आहेत. त्यांचे रिपोर्ट आज येण्याची शक्यता आहे. अभिषेक बच्चनसोबत वेबसीरिज ‘ब्रीद..’ मधील सहकलाकार अभिनेता अमित साधनेही कोरोनाची टेस्ट करणार आहे. 

शनिवारी रात्री उशिरा अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे या दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

अमिताभ व अभिषेक कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर ऐश्वर्या रायआणि आराध्याची टेस्टदेखील पॉझिटीव्ह आली.  यानंतर बच्चन कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची कोरोना टेस्ट केली जात आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच अनेक कलाकारांनी रिट्विट करत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चन