Join us  

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा बच्चनचा शानदार अ‍ॅक्टिंग डेब्यू! पाहा, व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 9:58 AM

 महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. श्वेता फिल्मी दुनियेत नाही. पण म्हणून फिल्मी दुनियेशी तिचे नातेचं नाहीच, असे मात्र मुळीच नाही. ग्लॅमर दुनियेपासून दूर असली तरी श्वेता कायम चर्चेत असते. 

अमिताभ बच्चन आणि श्वेता नंदा बच्चन या बापलेकीचे नाते कुणापासूनचं लपलेले नाही. श्वेता ही अमिताभ यांच्या काळजाचा तुकडा आहे. काही दिवसांपूर्वी या बापलेकीचा एक फोटो वेगाने व्हायरल झाला होता. यात दोघेही शूटींग करताना दिसले होते. फोटोवरून श्वेताच्या अ‍ॅक्टिंग डेब्यूबद्दल अनेक अंदाज बांधले गेले होते. अखेर या फोटोची सत्यता सर्वांसमोर आलीय. होय, श्वेताने आपल्या पापासोबत अ‍ॅक्टिंग डेब्यू केलाय. अर्थात ती कुठल्या चित्रपटात दिसणार नाहीये तर एका जाहिरातीत झळकलीय. ही जाहिरात सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

 

एका ज्वेलरी ब्रांडची ही जाहिरात तुम्हाला भावूक केल्याशिवाय राहणार नाही. खुद्द अमिताभही या जाहिरातीनंतर भावूक झालेत. ही जाहिरात आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत, त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘माझ्यासाठी भावूक करणारा क्षण...जेव्हा केव्हा मी हे पाहतो, तेव्हा माझ्या डोळ्यांत अश्रू तरळतात. मुली खरचं सुंदर असतात...’ असे त्यांनी लिहिले आहे.

या जाहिरातीत बिग बींचा अभिनय नेहमीप्रमाणे लाजवाब आहेच. शेवटी ते महानायक आहेत. पण श्वेतानेही या जाहिरात तेवढेच शानदार काम केले आहे. तिचा अ‍ॅक्टिंग डेब्यूही तितकाच शानदार आहे. त्यामुळेचं येत्या काळात श्वेता वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसली तर नवल वाटायला नको. महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. श्वेता फिल्मी दुनियेत नाही. पण म्हणून फिल्मी दुनियेशी तिचे नातेचं नाहीच, असे मात्र मुळीच नाही. ग्लॅमर दुनियेपासून दूर असली तरी श्वेता कायम चर्चेत असते. ४४ वर्र्षांची श्वेता ही अमिताभ व जया यांची मोठी मुलगी आहे. १९९७ मध्ये तिने निखील नंदासोबत लग्न केले. तिला नव्या नवेली नंदा आणि अगस्त्या नंदा अशी दोन मुले आहेत. लवकरच श्वेताने लिहिलेले पहिले पुस्तक ‘पॅराडाईज टॉवर्स’ प्रकाशित होतेय. खुद्द श्वेताने याबद्दल घोषणा केली होती. एक दिवस सकाळी उठले अन् माझ्या मनात हे पुस्तक लिहिण्याचा विचार आला. हे माझ्यासाठी अगदी स्वाभाविक आहे. माझे आजोबा साहित्यिक होते. मला साहित्यिकांचा वारसा लाभला आहे. लहानपणापासून लिहिण्या-वाचण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करण्यात आले आहे, असे श्वेताने सांगितले होते.

 

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूड