Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अमिताभ बच्चन म्हणतात, बाबुजींच्या लेखनावर केवळ माझा हक्क!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 11:56 IST

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी देशातील ६० वर्षे जुन्या कॉपीराईट कायद्यावर भलमोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ६० वर्षे जुना ...

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी देशातील ६० वर्षे जुन्या कॉपीराईट कायद्यावर भलमोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ६० वर्षे जुना हा कायदा निव्वळ निरर्थक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या ताज्या ब्लॉगमध्ये त्यांनी कॉपी राईट अ‍ॅक्टमधील एका त्रूटीवर नेमके बोट ठेवले आहे.आपली लेखनकृती किंवा कलाकृती सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने संबंधित लेखकाला किंवा कलावंताला कायद्याने प्राप्त झालेला हक्क म्हणजे कॉपीराईट अ‍ॅक्ट.सामान्यपणे वाङ्मयीन किंवा कलात्मक निर्मितीची प्रसिद्धी, प्रकाशन, प्रतिलिपी, त्याचप्रमाणे विक्री इत्यादींबाबत विशिष्ट काळापुरता लेखाधिकाराचा हक्क या कायद्याने निर्मात्याला दिलेला असतो. भारतात १९५७ मध्ये हा कायदा मंजूर केला गेला. नंतर तो देशभरात लागू झाला. मूळ निर्मात्याच्या मृत्यूच्या ६० वर्षांपर्यंत लेखाधिकाराचा हक्क अबाधित असतो. निर्मात्याच्या मृत्यूच्या ६० वर्षानंतर त्याच्या रचना सर्वसामान्यांच्या होतात. कॉपी राईट कायद्याच्या नेमक्या याच तरतूदीवर अमिताभ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लेखकाची निर्मिती त्याच्या मृत्यूनंतरही जिवंत असते. अशात कॉपी राईट कायद्यात ६० वर्षांची मर्यादा का?  लेखकाच्या रचनांवर लेखाधिकाराचा हक्क विशिष्ट काळापुरता मर्यादीत असायला नको. या रचना निरंतर कॉपीराईट असायला हव्यात. माझ्या बाबूजींच्या रचनांवर केवळ माझा हक्क आहे. मौलिक रचना लेखकाचा वारसा असतो आणि लेखकाच्या मृत्यूनंतर ६० वर्षांनी त्या सामान्य जनतेच्या होतात. असे का? या नियमाला माझा तीव्र विरोध आहे. माझ्या बाबुजींच्या रचना माझा वारसा आहे. त्यावर ६० वर्षांपर्यंतचं नाही तर कायम माझाच अधिकार असेल. मी या कॉपीराईट कायद्याला केवळ विरोध करत नाही तर या कायद्याशी पूर्णपणे असहमत आहे. कारण माझा वारसा केवळ माझा आहे. माझ्या बाबुजींचे लेखन मी सामान्य जनतेच्या हवाली करू शकत नाही. त्यांचे लेखन फक्त माझे आहे, असे अमिताभ यांनी म्हटले आहे.ALSO READ : ​फोटोत दिसणारी ‘ही’ व्यक्ती अमिताभ बच्चन नाही तर मग आहे तरी कोण?