Join us

तामिळ चित्रपटसृष्टीतही होणार अमिताभ बच्चन यांचा डेब्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 12:13 IST

होय, साऊथमध्ये एन्ट्री घेण्यास अमिताभ सज्ज झाले आहेत. 

अमिताभ बच्चन सध्या ‘केबीसी दशम’मुळे चर्चेत आहेत. शेकडो चित्रपट काम करणाऱ्या या महानायकाने प्रेक्षकांचे अपार मनोरंजन केले. आता ते एक नवी इनिंग सुरु करताहेत. होय, साऊथमध्ये जबरदस्त एन्ट्री घेण्यास अमिताभ सज्ज झाले आहेत. रजनीकांत व कमल हासन सारख्या सुपरस्टार्सचा बोलबाला असलेल्या तामिळ सिनेसृष्टीत अमिताभ डेब्यू करणार आहेत.  , ‘उयारंधा मणिधन’ नामक तामिळ चित्रपटात अमिताभ दिसणार आहेत. तमिलवानन या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील.

मीडियाशी बोलताना तमिलवानन यांनी याबाबची घोषणा केली. अमिताभ बच्चन या देशातील सर्वांत मोठ्या सुपरस्टार्ससोबत कुणाला काम करायला आवडणार नाही. हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे, असे तमिलवानन म्हणाले.या चित्रपटात तामिळ अभिनेता एसजे सूर्या लीड रोलमध्ये आहे. हा चित्रपट तामिळ आणि हिंदी अशा दोन्ही भाषांत बनवला जाईल. काही दिवसांपूर्वीच अमिताभ यांनी चिरंजीवी स्टारर ‘साइ रा नरसिंहा रेड्डी’ हा चित्रपट साईन केला. याचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट स्वत्रंतता सेनानी नारसिंम्हा रेड्डी ह्याच्या जीवनावरवर आधारित आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चन