अशीच काहीशी स्थिती महानायक अमिताभ बच्चन यांची झाल्याचे बघावयास मिळाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या जवानांची परेड बघून ते चांगलेच गहिवरल्याचे दिसून आले. आज अमिताभ बच्चन राजपथावर उपस्थित होते. परेडमध्ये भारतीय जवानांनी सादर केलेली प्रात्याक्षिके पाहुन अमिताभ बच्चन यांचा ऊर अभिमानाने भरून आला.
पुढे बिग बींनी याबाबाते ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, प्रजासत्ताक दिनाची परेड पाहतो. हा अभिमानाचा क्षण आहे. जेव्हा जवानांची परेड सुरु होती तेव्हा डोळ्यात अक्षरश: अश्रू तरळले. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. जेव्हा आम्ही दिल्लीत होतो तेव्हा सीट पकडण्यासाठी धावायचे. जय हिंद! अमतिाभ बच्चन यांनी ट्विटरवर आपल्यासह मुलगा अभिषेक बच्चनचाही फोटो शेअर करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
T 2594 - Watching Republic Day Parade in Delhi .. what a moment of pride .. tears welling up as the Army marches past .. memories of the early years in Delhi, when we would clamour for seats to watch the parade ! JAI HIND !!