Join us

Goodbye : अमिताभ यांच्या वाढदिवशी प्रेक्षकांना मिळणार खास गिफ्ट, स्वस्त होणार ‘गुडबाय’चं तिकिट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 15:58 IST

Goodbye : अमिताभ बच्चन व रश्मिका मंदानाचा ‘गुडबाय’ अद्यापही बघितला नसेल तर ही आहे खास ऑफर

बिझनेस वाढावा यासाठी बॉलिवूड इंडस्ट्रीने तिकिटांवर ऑफर सुरू केल्या आहेत. नॅशनल सिनेमा डेच्या निमित्ताने याची सुरूवात झाली. 23 सप्टेंबरला देशातील अनेक मल्टिप्लेक्समध्ये केवळ 75 रूपयांत प्रेक्षकांनी सिनेमा बघितला. यामुळे ब्रह्मात्र या सिनेमाला चांगलाच फायदा झाला. यानंतर ‘ब्रह्मास्त्र’च्या मेकर्सनी नवरात्रोत्सवाचं निमित्त साधत तीन दिवसांची विशेष ऑफर जाहीर केली. केवळ 100 रूपयांत सिनेमा पाहण्याची संधी यामुळे प्रेक्षकांना साधता आली. प्रेक्षकांनी या ऑफरला भरभरून प्रतिसाद दिला. आता ‘गुडबाय’च्या ( Goodbye) मेकर्सनी देखील अशीच एक खास घोषणा केलीये.

होय, येत्या 11 ऑक्टोबरला ‘गुडबाय’ केवळ 80 रूपयांत पाहता येणार आहे. 11 तारखेला महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)आपला 80 वा वाढदिवस साजरा करत आहेत. याच निमित्ताने मेकर्सनी प्रेक्षकांसाठी ही खास ऑफर जाहीर केली आहे.

‘गुडबाय’ हा सिनेमा 7 ऑक्टोबरला रिलीज झाला. या सिनेमात अमिताभ बच्चन, रश्मिका मंदाना व नीना गुप्ता मुख्य भूमिकेत आहेत. ‘गुडबाय’ला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा फारच कमी प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ 1.2 कोटींचा बिझनेस केला. दुसºया दिवशी शनिवारी  या चित्रपटाने 1.50 कोटींची कमाई केली. म्हणजेच दोन दिवसांत या चित्रपटाने केवळ 2.70 कोटींचा गल्ला जमवला. ‘गुडबाय’चा बजेट 30-40 कोटी आहे. चित्रपटाचं कलेक्शन बघता हा सिनेमा बजेट वसूल करणार की नाही, अशी चिंता मेकर्सला सतावू लागली आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनरश्मिका मंदानाबॉलिवूड