अमिताभ बच्चन आणि संजय दत्तनेच दिले सुनील शेट्टीला ‘बॉलिवूडचा अण्णा’ हे नाव!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 17:12 IST
१९९२ मध्ये ‘बलवान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअर करणाºया अभिनेता सुनील शेट्टीला आज संपूर्ण बॉलिवूड ‘अण्णा’ या नावाने ओळखतो. इंडस्ट्रीतील ...
अमिताभ बच्चन आणि संजय दत्तनेच दिले सुनील शेट्टीला ‘बॉलिवूडचा अण्णा’ हे नाव!!
१९९२ मध्ये ‘बलवान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअर करणाºया अभिनेता सुनील शेट्टीला आज संपूर्ण बॉलिवूड ‘अण्णा’ या नावाने ओळखतो. इंडस्ट्रीतील फिट अभिनेता म्हणून ओळख असलेल्या सुनील शेट्टीने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सुनील नुकताच ‘द जेंटलमॅन’ या चित्रपटात झळकला होता. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल केली नव्हती. वास्तविक सुनील २०१० नंतर फारशा बॉलिवूडपटांमध्ये झळकला नाही. मात्र त्याच्या हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि फॅशन बुटीकमधील कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीमुळे तो नेहमीच चर्चेत आहे. असो, आज आम्ही सुनीलचा अण्णा कसा झाला हे तुम्हाला सांगणार आहोत. कारण बरेचसे असे लोक आहेत, ज्यांना हे माहिती नाही की, अखेर सुनीलला अण्णा हे नाव कसे पडले. एका मुलाखतीदरम्यान सुनील शेट्टीने या नावामागची खरी कथा सांगितली. सुनीलने सांगितले की, ‘मी जेव्हा २००२ मध्ये आलेल्या ‘कांटे’ या चित्रपटाची शूटिंग करीत होतो, तेव्हा सेटवर मला ‘अण्णा’ हे नाव देण्यात आले. या चित्रपटात सुनील शेट्टीसोबत महानायक अमिताभ बच्चन आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका होत्या. शूटिंगच्या ब्रेकदरम्यान संजूबाबा सुनीलला वारंवार ‘अण्णा’ या नावाने हाक मारीत असे. संजय दत्तच्या मते, सुनील सेटवर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाप्रमाणे वावरायचा. त्यामुळेच मी त्याला ‘अण्णा’ या नावाने हाक मारत असे. पुढे तर संजूबाबाप्रमाणे महानायक अमिताभ बच्चनही सुनीलला ‘अण्णा’ या नावानेच हाक मारू लागले. दोन दिग्गज जेव्हा सुनील शेट्टीला ‘अण्णा’ या नावाने हाक मारू लागल्याचे लक्षात आल्यानंतर सेटवरील सर्वच सुनील शेट्टीला ‘अण्णा’ म्हणून बोलू लागले. सुनील शेट्टीने याविषयी सांगितले होते की, ‘माझे सुरुवातीचे नाव आता इंडस्ट्रीतील लोक विसरले आहेत. कारण प्रत्येकजण मला अण्णा या नावानेच हाक मारतो. मी कुठल्याही पार्टी अथवा समारंभात उपस्थित होतो, तेव्हा तेथील लोक मला ‘अण्णा’ या नावानेच हाक मारतात.