Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अमिताभ बच्चन अन् अक्षय कुमार पुन्हा येणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 22:01 IST

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन व बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार तब्बल दहा वर्षांनतर पुन्हा एकत्र येणार आहेत. दिग्दर्शक आर. बल्की ...

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन व बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार तब्बल दहा वर्षांनतर पुन्हा एकत्र येणार आहेत. दिग्दर्शक आर. बल्की यांच्ता आगामी चित्रपटात हे दोन्ही अभिनेता एकत्र आलेले त्यांच्या चाहत्यांना पहायला मिळणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या सोबत केलेला अखेरचा सिनेमा दहा वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. तेव्हापासून या दोन स्टार्स एकत्र पाहता यावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. हे काम आर. बल्की करणार आहेत. आर. बल्की यांचे आवडते अभिनेते म्हणून अमिताभची ख्याती आहेच. त्याच्या बॉलिवूडमधील बहुतेक सर्व सिनेमांत अमिताभ यांची महत्त्वाची भूमिका असतेच. दुसरीकडे अक्षय कुमारचा हा आर, बल्की सोबत पहिलाच चित्रपट असेल. सध्या तरी या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही, मात्र बल्की यांनी दोन्ही कलावंतांना कथा सांगितली असल्याची माहिती मिळते आहे. मागील महिन्यात त्यांनी अक्षयची भेट घेतल्याची बातमी आली होती. मात्र यानंतर अक्षय ‘टॉयलेट’च्या शूटिंगमध्ये व्यस्त झाल्याने याबाबत अधिक खुलासा झाला नव्हता. आता या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात झाली असून शूटिंग शेड्युल ठरविण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बल्कीच्या पत्नी गौरी शिंदे यांच्या डिअर जिंदगी प्रदर्शित झाल्यावर याच्या कामाला गती मिळेल असेही सांगण्यात येते.  वेगळ्या धाटणीचे सिनेमे करण्यासाठी प्रसिद्ध असलेले बल्की हे त्यांच्या चित्रपटात अक्षयला कोणती भूमिका देणार याची चर्चा रंगली आहे. या नव्या चित्रपटात अक्षयची मुख्य भूमिका असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी अमिताभ यांनी बल्कीच्या ‘की अ‍ॅन्ड का’, ‘चीनी कम’, ‘शमिताभ’ आणि ’पा’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. अमिताभ यांनी यापूर्वी ‘वक्त’, ‘आन’ व खाकी या चित्रपटात अक्षयसोबत काम केले आहे.