Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ-अभिषेकची भरपावसात ‘रुस्तम’च्या स्क्रीनिंगला हजेरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 17:21 IST

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार याचा ‘रुस्तम’ हा सिनेमा काल शुक्रवारी  रिलीज झाला. तत्पूर्वी खास बॉलिवूडमधील मित्र-मंडळींसाठी ‘रुस्तम’चे खास स्क्रीनिंग ...

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार याचा ‘रुस्तम’ हा सिनेमा काल शुक्रवारी  रिलीज झाला. तत्पूर्वी खास बॉलिवूडमधील मित्र-मंडळींसाठी ‘रुस्तम’चे खास स्क्रीनिंग ठेवले गेले. या स्क्रीनिंगला बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी हजेरी लावली. विशेष म्हणजे महानायक अमिताभ बच्चन आणि  अभिषेक बच्चन हेही यावेळी दिसले. मुंबईत पाऊस कोसळत असूनही अमिताभ व अभिषेक यांनी या स्क्रीनिंगला हजेरी लावण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर अभिषेकसमवेत अमिताभ स्वत: ड्रायव्हिंग करत या स्क्रीनिंगला पोहोचले. अभिषेक आणि अक्षय या दोघांनी ‘हाऊसफुल 3’मध्ये एकत्र काम केलेय. तेव्हापासून त्यांच्यात चांगली बॉन्डिंग आहे. अक्षय व अभिषेक अनेकदा एकमेकांची स्तूती करताना दिसतात ते त्यामुळेच. कदाचित याच बॉन्डिंगमुळे अमिताभ व अभिषेक दोघांनीही भरपावसात   ‘रुस्तम’च्या स्क्रीनिंगला  उपस्थिती नोंदवली.  यावेळी अभिषेकच्या ड्रेसिंग स्टाईलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पठानी सूट आणि मानेभोवती शाल अशा पोशाखात अभिषेक स्क्रीनिंगला पोहोचला. त्याचा रूबाब सगळ्यांनाच अपील झाला, हे वेगळे सांगायला नकोच!!