Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ: वेदना विसरायला २५ वर्षे लागलीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 20:50 IST

अमिताभ बच्चन आणि बोफोर्स घोटाळा, आपणा सर्वांना ठाऊक आहेच. अमिताभ व त्यांचे कुटुंब या घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप झाला ...

अमिताभ बच्चन आणि बोफोर्स घोटाळा, आपणा सर्वांना ठाऊक आहेच. अमिताभ व त्यांचे कुटुंब या घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप झाला आणि अमिताभच्या एकूणच प्रतीमेलाही तडा गेला. तब्बल २५ वर्षांनंतर अमिताभ यांनी हा आरोप आणि त्या आरोपानंतरच्या वेदना यावर ब्लॉक लिहिला आहे. मी निर्दोष होतो. पण निर्दोष असूनही या वेदना विसरायला २५ वर्षे लागलीत, असे त्यांनी लिहिलेयं. बोफोर्स प्रकरणात अमिताभ बच्चन निर्दोष असल्याचा खुलासा स्वीडनचे माजी पोलिसप्रमुख स्टेन लिंडस्ट्रॉम यांनी केला होता. त्यावेळी ‘गॉड इज ग्रेट’ अशी प्रतिक्रिया अमिताभ यांनी दिली होती.बच्चन कुटुंबाला फसवले गेले...अमिताभ यांनी लिहिलेयं, बोफोर्स घोटाळ्यात माझे व  माझ्या कुटुंबाला गोवले गेले आणि आमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू अधिकाधिक वाईट पद्धतीने सादर केला गेला. २५ वर्षांनंतर प्रॉसिक्युटरने सत्य समोर आणले. बच्चन कुटुंबाला फसवले गेले होते. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या जगात आरोप लावणे सोपे आहे. आरोप खरे की खोटे, याची शहानिशा करण्याची गरजही कुणाला अशावेळी वाटत नाही.मी काय बोलणार होतो...स्वीडनच्या एका व्हिसल ब्लोअरने २०१२ मध्ये क्लिनचीट दिली होती. मात्र दीर्घकाळ मला खोट्या आणि फसवणुकीचे ओझे वाहून न्यावे लागले. मला यात गोवण्यात आलेय, हे सिद्ध झाल्यावर माझी प्रतिक्रिया विचारण्यात आली. पण मी काय बोलणार होतो. २५ वर्षे मी ज्या वेदना भोगल्या त्या कशा कमी होणार होत्या. माझ्या मानहानीचे ते काळेकुट्ट व्रण मिटवता येऊ शकतील?