Join us

अमिषा पटेल-बिपाशा बसूमध्ये आहे ३६चा आकडा, कॅटफाइटवर गदर फेम अभिनेत्री म्हणाली - "हो मी अशीच आहे...."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 15:54 IST

Amisha Patel And Bipasha Basu : अमिषा पटेल आणि बिपाशा बसू या दोघींमध्ये ३६चा आकडा आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये दोघींनीही एकमेकांना टोमणे मारले होते.

बॉलिवूडमध्ये 'कॅटफाइट्स'चे अनेक किस्से आहेत. बबिता-नीतू कपूर, ऐश्वर्या राय-राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा-करीना कपूर, दीपिका पदुकोण-कतरिना कैफ, कंगना राणौत-तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर, अशी अनेक नावे आहेत. यापैकी एक नाव अमिषा पटेल (Amisha Patel) आणि बिपाशा बसू (Bipasha Basu) यांचेही आहे. या दोघींमध्ये ३६चा आकडा आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शो(Koffee With Karan Show)मध्ये दोघींनीही एकमेकांना टोमणे मारले होते.

हे प्रकरण काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या बिपाशा बसूच्या 'जिस्म' चित्रपटाशी संबंधित आहे. बॉलिवूडमधील बऱ्याचशा कॅटफाइट पॉपुलर चॅट शो कॉफी विथ करणमधून सुरू झाल्या आहेत. या शोमध्ये एकदा बिपाशा बासू आणि अमिषा पटेल यांनी एकमेकांवर अशा काही कमेंट्स केल्या, ज्यानंतर त्या दोघी एकमेकींच्या कट्टर शत्रू झाल्या. दरम्यान आता या कॅटफाइटवर गदर फेम अभिनेत्री अमिषा पटेल म्हणाली की, त्यांच्यात असं काहीच नाही. तिने या चर्चेला अफवा म्हटलं.

बिपाशाने केलेल्या बॉडी शेमिंगवर अमिषाने कधीच दिली नाही प्रतिक्रिया

'फिल्मीमंत्रा'ला दिलेल्या अलिकडच्या मुलाखतीत अमिषाला करीना कपूर खान, बिपाशा बसू आणि तिच्यातील कॅटफाइटबद्दल विचारण्यात आले. अभिनेत्रीने सांगितले की, तिचे कोणाशीही असे भांडण झाले नाही, परंतु तिच्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या गेल्या आहेत. 'कॉफी विथ करण'च्या एका भागात बिपाशा बसूने केलेल्या बॉडी-शेमिंगबद्दल तिला विचारले असता, अमिषाने म्हटले की, 'मी त्यावर कधीही प्रतिक्रिया दिली नाही. मला वाटते की तुम्ही आतल्या असुरक्षिततेला बाहेर काढता आणि त्या दाखवता. मला वाटते की सार्वजनिक व्यासपीठावर असे करू नये. पण, बिपाशाने ते केले आणि प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टिकोन असतो.'

''मी कधीच कोणाला कमी लेखले नाही...''अमिषाने खुलासा केला की, ती अर्जुन रामपालसोबत टॉक शोमध्ये येणार होती, पण दुर्दैवाने, शोच्या काही दिवस आधी तो आजारी पडला आणि ते एकत्र येऊ शकले नाहीत. अमिषाने सांगितले, करणने मला विचारले की ‘पुढच्या आठवड्यात शोमध्ये तुला काय सांगायचे आहे?’ मी म्हणालो, ‘करण, कोणतीच कमेंट करु नको. मी कमेंट करत नाही आणि तो म्हणाला, अरे, हा तुमचा टिपिकल साउथ मुंबईतील दृष्टिकोन आहे.’ मी म्हणाले, ‘हो, मी अशीच आहे. मी माझ्या कारकिर्दीत कधीही कोणाला कमी लेखले नाही. लोकांनी माझ्याशी असे केले आहे, पण मी कधीही तसे केले नाही. मी कधीही इतक्या खालच्या पातळीवर गेले नाही आणि मी त्यावर विश्वास ठेवत नाही.’

बिपाशाने केलेली कमेंटखरंतर, जेव्हा बिपाशा बसू अमिषानंतर ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये दिसली तेव्हा करण जोहरने अभिनेत्रीला सांगितले की अमिषा पटेल म्हणाली होती की ती कधीही जिस्मसारखा चित्रपट करणार नाही कारण तिची आजी नाराज झाली असती. यावर प्रतिक्रिया देताना बिपाशाने अमिषावर टीका केली. बिपाशा म्हणाली, 'अमिषा असे चित्रपट करत नाही कारण तिचे शरीर 'जिस्म'सारख्या चित्रपटासाठी फिट नाही. मी तिला 'जिस्म'मध्ये कधीच कास्ट करणार नाही. ती अशा चित्रपटांमध्ये बसत नाही. ती इतक्या बोल्ड चित्रपटासाठी खूप बारीक आणि लहान आहे.'

टॅग्स :अमिषा पटेलबिपाशा बासू