आमीर करणार का बायोपिकमध्ये काम ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 14:50 IST
भारताचा पहिला खगोलशास्त्रज्ञ राकेश शर्मा याच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये काम करणार का? या प्रश्नावर आमीर खानने बोलणे टाळले. त्याचे ...
आमीर करणार का बायोपिकमध्ये काम ?
भारताचा पहिला खगोलशास्त्रज्ञ राकेश शर्मा याच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये काम करणार का? या प्रश्नावर आमीर खानने बोलणे टाळले. त्याचे म्हणणे आहे की,‘ मी अद्याप चित्रपट साईन केला नाही. सध्या मी स्क्रिप्ट वाचतोय आणि कोणकोणत्या शक्यता असतील यावर विचार करतोय.जेव्हा मी एखादा चित्रपट साईन करेन त्याचवेळेस मला त्यावर बोलण्याचा अधिकार असतो नाही का? जेव्हा दिग्दर्शक माझ्याकडे एखादा विषय घेऊन येतात तेव्हा त्यांना माझ्याकडून विश्वासाची अपेक्षा असते.पण, मी जर त्यांची अपेक्षा पूर्ण करू शकणार नसेल तर त्यात काय फायदा आहे? त्यामुळे मी चित्रपट साईन करेन तेव्हा स्वत: सांगेन.’