अलीकडे आमिरने त्याच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’चे शूटींग संपवले. लवकरच या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये आमिर बिझी होणार आहे. शिवाय ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे शूटींगही त्याला पूर्ण करायचे आहे. त्यापूर्वी आमिरने बे्रक घ्यायचे ठरवले. आझादच्या समर व्हॅकेशन लवकरच संपणार आहे. तत्पूर्वी त्याच्यासोबत क्वालिटी टाईम घालवण्यासाठी आमिर व किरण असे सगळे इटलीत पोहोचलेत. सध्या हे कुटुंब रोमध्ये आहे. रोमच्या रस्त्यांवर फिरतानाचे क्यूट फोटो तुम्ही याठिकाणी पाहू शकणार आहात.
ALSO READ : आमिर खानने पुन्हा चालवलायं शरीराशी खेळ! विश्वास बसत नसेल तर पाहाच!!
या फोटोंमधली एक गोष्ट तुम्ही नोट केली असेलच. ती म्हणजे, यात आमिर त्याच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ लूकमध्ये दिसतो आहे. पिळदार मिशा आणि नाकात नोझ रिंग, असा त्याचा लूक आहे. या चित्रपटात आमिर व अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तुर्तास ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मधील आमिर व फातिमाचा लूक आऊट झाला आहे. पण अमिताभ व कॅटरिनाचा यातील लूक अद्यापही दडवून ठेवण्यात आला आहे.