Join us

​शाहरुखला अडविल्याबद्दल अमेरिकेची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 09:58 IST

शाहरुख खानला चौकशीसाठी अमेरिकेतील लॉस एंजेलिस विमानतळावर अडविल्याबद्दल अमेरिकेने या प्रकाराबाबत माफी मागितली आहे. तसेच असा प्रकार पुन्हा होणार ...

शाहरुख खानला चौकशीसाठी अमेरिकेतील लॉस एंजेलिस विमानतळावर अडविल्याबद्दल अमेरिकेने या प्रकाराबाबत माफी मागितली आहे. तसेच असा प्रकार पुन्हा होणार नाही असे आश्वासनही दिलं आहे. शाहरुखने या सर्व प्रकाराबाबत ट्विटरद्वारे माहिती देत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अमेरिकेतील भारताचे राजदूत रिचर्ड वर्मा यांनी ट्विटरद्वारे शाहरुखची माफी मागितली. यापुढे असा प्रकार होऊ नये, यासाठी काळजी घेतली जाईल, असं आश्वासन वर्मा यांनी दिलं आहे.शाहरूखसोबत २०१२ मध्येही न्यूयॉर्क एअरपोर्टवर असाच प्रकार घडला होता. यानंतर अमेरिकेने या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. शाहरुखला २००९  मध्येही न्यू जर्सी येथे अडवण्यात आलं होतं. दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या ‘स्पॉटेड’ या चित्रपटाच्या शुटिंगसाठी जात होता.