अमिषा पटेल अशी पडली मागे की, रणबीर कपूरने काढला पार्टीमधून पळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 12:26 IST
अभिनेत्री अमिषा पटेल आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यात काहीतरी शिजतयं? आम्हाला दाव्यानिशी सांगता येणार नाही. पण मध्यंतरी अमिषा व ...
अमिषा पटेल अशी पडली मागे की, रणबीर कपूरने काढला पार्टीमधून पळ!
अभिनेत्री अमिषा पटेल आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यात काहीतरी शिजतयं? आम्हाला दाव्यानिशी सांगता येणार नाही. पण मध्यंतरी अमिषा व रणबीर यांच्यात काहीतरी खिचडी शिजत असल्याची बातमी चर्चेत होती. अलीकडे रणधीर कपूर यांच्या बर्थ डे पार्टीत अमिषाची हजेरी म्हणूनच चर्चेचा विषय ठरली होती. रणबीर कपूर याची खास असल्याने अमिषा या पार्टीत आल्याचे सांगितले गेले होते. या पार्टीतला रणबीर कपूरसोबतचा अमिषाचा फोटो मग चांगलाच व्हायरल झाला होता. पण या व्हायरल झालेल्या फोटोनंतर रणबीर कपूर खळबळून जागा झालायं. होय, ताजी बातमी तरी हेच सांगणारे आहे. काल-परवा एका पार्टीत अमिषा पटेल रणबीरच्या म्हणे भलतीच मागे पडली. इतकी की,शेवटी रणबीरने म्हणे या पार्टीतून पळ काढणेच योग्य समजले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अमिषा पटेल वारंवार रणबीर कपूरशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. अमिषाला म्हणे रणबीरशी काहीतरी खासगी बोलायचे होते. पण रणबीरच्या अवती-भवती अनेकांचा गोतावळा होता. पण असे असूनही अमिषा मात्र पूर्णवेळ रणबीरच्या मागे-पुढे फिरत होती. अखेर अमिषाच्या या वागण्यामुळे रणबीर इतका अस्वस्थ झाला की, त्याने पार्टी सोडून बाहेर पडणेच योग्य समजले. रणबीर कपूर अचानक पार्टी सोडून गेला, हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, रणबीर आधी अमिषाशी अतिशय सौजन्यपूर्ण वागत होता. पण अमिषा त्याला वेगळे काढून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू पाहते म्हटल्यावर तो अस्वस्थ झाला. अमिषाला रणबीरशी काय बोलायचे होते, हे तर कळले नाही. पण यामुळे रणबीरला पार्टी सोडून जावे लागले, हे मात्र नक्की.सध्या अमिषा पटेल बॉलिवूडमध्ये फार अॅक्टिव्ह दिसत नाही. पण लवकरच तिचा ‘भैय्याजी सुपरहिट’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात ती सनी देओलसोबत दिसणार आहे.