Join us  

बिहार निवडणूक प्रचाराहून परतली अमीषा पटेल, म्हणाली - 'माझा रेपही होऊ शकला असता'

By अमित इंगोले | Published: October 28, 2020 12:05 PM

अमीषा पटेलचा आरोप आहे की, बिहार पोहोचल्यावर डॉक्टर प्रकाश चंद्रा यांनी जबरदस्तीने प्रचार करण्यासाठी तिला ब्लॅकमेल केलं होतं.

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. अनेक नेत्यांनी आपल्या प्रचारासाठी मोठ्या स्टार्सना बोलवलं होतं. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील ओबरा सीटचे लोक जनशक्ति पार्टीचे उमेदवार डॉक्टर प्रकाश चंद्रा यांनीही सेलिब्रिटी बोलवले होते. त्यांनी अभिनेत्री अमीषा पटेलला प्रचारासाठी बोलवलं होतं. या प्रचार रॅलीला मोठा गर्दी जमली होती. पण आता प्रचाराहून परतल्यावर अमीषा पटेल ने डॉक्टर प्रकाश चंद्रा यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.

जबरदस्तीने प्रचार?

NBT ने दिलेल्या वृत्तानुसार, अमीषा पटेलचा आरोप आहे की, बिहार पोहोचल्यावर डॉक्टर प्रकाश चंद्रा यांनी जबरदस्तीने प्रचार करण्यासाठी तिला ब्लॅकमेल केलं होतं. अमीषा म्हणाली की, तिला सांगण्यात आलं होतं की, जिथे प्रचार होणार आहे. ते ठिकाणा पटनाच्या जवळ आहे. पण ओबरा तेथून फार दूर आहे. ती म्हणाली की, 'मला सायंकाळी मुंबईला परत यायचं होतं. पण डॉक्टर चंद्रा यांनी धमकावत माझ्याकडून प्रचार करून घेतला. जेव्हा मी तिथून जाण्याबाबत बोलले तर ते म्हणाले की, आम्ही तुला या गावात एकटं सोडून जाऊ'.

'माझा रेपही होऊ शकला असता'

अमीष पटेलने आरोप लावला की, प्रकाश चंद्रा यांनी तिला जबरदस्तीने गर्दीत जाण्यासाठी सांगितलं. ती म्हणाली की, 'प्रचारादरम्यान हजारो लोक जमले होते. हे लोक वेड्यासारखे गाडीला ठोकत होते. प्रकाश चंद्रा यांनी मला गाडीतून उतरून गर्दीत जायला सांगितलं. गर्दीतील लोक कपडे फाडण्यासाठी तयार होते. तिथे माझा रेपही झाला असता'. अमीषाने सांगितलं की, प्रचारानंतर साधारण ८ वाजता ती हॉटेलला पोहोचली.

अमीषा म्हणाली की, बिहार निवडणूक प्रचारादरम्यान ती अनेक वाईट अनुभवातून गेली. ती म्हणाली की, ती प्रचारातून हॉटेलवर पोहोचेपर्यंत काहीच खाऊ शकली नाही आणि झोपूही शकली नाही. ती म्हणाली, 'माझा बिहारमध्ये जाण्याचा अनुभव फारच वाईट आहे. जे लोक निवडणूक जिंकण्याआधी माझ्यासारख्या महिलेसोबत असा व्यवहार करू शकतात ते निवडणूक जिंकल्यावर जनतेसोबत कसा व्यवहार करतील. प्रकाश चंद्रा फार खोटारडा, ब्लॅकमेलर आणि वाईट व्यक्ती आहे'. 

टॅग्स :अमिषा पटेलबॉलिवूडबिहार विधानसभा निवडणूक