Join us  

पुष्पा राज! 750 कोटीत विकले होते RRRचे राईट्स, अल्लू अर्जुनने 'Pushpa 2'साठी मागितली मोठी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 2:36 PM

'पुष्पा'च्या अफाट यशानंतर अल्लू अर्जुन पॅन इंडियाचा स्टार बनला आहे. 'पुष्पा 2 चित्रपटाविषयी प्रचंड चर्चा निर्माण झाली आहे.

 Allu Arjun Pushpa 2 Overseas Theatrical Rights:अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या 'पुष्पा 2' (Pushpa 2)या चित्रपटाविषयी प्रचंड चर्चा निर्माण झाली आहे. चाहते चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, 'पुष्पा 2' च्या राईट्सबाबत मोठी बातमी समोर येत आहे. या आगामी चित्रपटाच्या राईट्ससाठी निर्मात्यांनी मोठ्या रकमेची मागणी केल्याची चर्चा आहे, जे 'आरआरआर'च्या राईट्सपेक्षा ही जास्त आहे.

'पुष्पा'च्या अफाट यशानंतर अल्लू अर्जुन पॅन इंडियाचा स्टार बनला आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत चाहत्यांमध्येही मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे, हे पाहून कलाकार त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेता आणि समीक्षक केआरकेने एक ट्विट केले आहे ज्यात त्याने लिहिले आहे की, 'अल्लू अर्जुनने पुष्पा 2 च्या राईट्स विकण्यासाठी 1050 कोटी रुपये मागितले आहेत. RRR चे राईट्स 750 कोटींना विकले गेले. म्हणजेच अल्लू अर्जुनला विश्वास आहे की त्याचा चित्रपट RRR पेक्षा मोठा आहे.'

अल्लू अर्जुनला वाढदिवसाचं मिळणार सरप्राईज अल्लू अर्जुनने या चित्रपटाचे राईट्स 1050 कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला आहे. अल्लू अर्जुनचा नवा लूक मेकर्स लवकरच आऊट करणार आहेत, अशा बातम्याही समोर येत आहेत. अल्लू अर्जुनच्या 41 व्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शक सुकुमार त्याला एक मोठे सरप्राईज देणार आहेत. या खास प्रसंगी 'पुष्पा 2' मधील अल्लू अर्जुनचा लूक किंवा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

'पुष्पा: द राइज' (Pushpa 2)गेल्या वर्षी 17 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट तामिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अल्लू अर्जुन लाल चंदन तस्कर पुष्पराजच्या भूमिकेत दिसला होता, तर रश्मिका मंदान्नाने श्रीवल्लीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने 110 कोटींची बंपर कमाई केली. दुसरीकडे, 'पुष्पा 2' च्या रिलीजबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट 2024 मध्ये थिएटरमध्ये दाखल होईल. 

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पाTollywood