Join us

आलियाचे थंडा थंडा कूल कूल...!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 05:16 IST

शाहरूख खान आणि आलिया भट्ट हे दोघेही गौरी शिंदे हिच्या नव्या चित्रपटात काम करीत आहे. चित्रपटाचे शुटींग सुरु आहे ...

शाहरूख खान आणि आलिया भट्ट हे दोघेही गौरी शिंदे हिच्या नव्या चित्रपटात काम करीत आहे. चित्रपटाचे शुटींग सुरु आहे ते गोव्यात. आता गोवा म्हटल्यावर गर्मी असणारच. मग काय, आपली आलिया बेबी आणि गर्मीचे आधीच वैर. शुटींगदरम्यान गर्मीने आलिया कासावीस झाली. इतकी की बिचारीला काय करू नि काय नाही, हेच सुचेना...शाहरूखला बिचाºया आलियाची ही स्थिती काही बघवेना. अशास्थितीत शाहरूखने काय केले असावे, तर आलियाला चक्क एक पोर्टेबल फॅन भेट दिला. आहे की नाही आलिया बेबीची मज्जा!!! थंडा थंडा कूल कूल...!!!