लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यात आलिया-रणबीरची गळाभेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांनी अशी एकमेकांची गळाभेट घेतली.
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यात आलिया-रणबीरची गळाभेट!
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांनी अशी एकमेकांची गळाभेट घेतली. आलिया, तू खूप गोड दिसतेयं, असे रणबीर कपूर आलियाच्या कानात सांगत नसावा ना? लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर चुलबुली आलिया भट्ट हिची एन्ट्री झाली अन् आपल्या चाहत्यांना तिने असे अभिवादन केले. रणबीर कपूर आणि दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी एकत्र अशी मस्त पोझ दिली. मराठमोळ्या मनांना आपल्या सौंदर्याने वेड लावणारी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्याच्या रेडकार्पेटवरील लूक एकदम स्टाईलिश ठरला. संपूर्ण देशवासियांना ‘सैराट’ करणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरू हिने लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. सिनेमा क्षेत्रातील महिला कॅटेगरीत लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर-2017 या पुरस्काराने यावेळी तिला गौरविण्यात आले. आर्ची अर्थात रिंकू राजगुरू आणि ‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अशी एकत्र पोझ दिली. ‘दुर्वा’ फेम मराठी अभिनेत्री हृता दुगुर्ळे हिची साडीतील अदा सगळ्यांना मोहवून गेली.