‘गोलमाल ४’ मध्ये आलिया किंवा दीपिका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 11:16 IST
अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी जेव्हापासून ‘गोलमाल ४’ चित्रपटाची घोषणा केली आहे. तेव्हापासून चित्रपटात कोण हिरोईन असणार? यावर ...
‘गोलमाल ४’ मध्ये आलिया किंवा दीपिका!
अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी जेव्हापासून ‘गोलमाल ४’ चित्रपटाची घोषणा केली आहे. तेव्हापासून चित्रपटात कोण हिरोईन असणार? यावर तुफान चर्चा सुरू झाली. आलिया भट्ट आणि दीपिका पादुकोण यांच्यात मुख्य भूमिकेसाठी रस्सीखेच सुरू झाली.दिग्दर्शक रोहित शेट्टी चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाला,‘ आलियाकडे तर वेळ नाहीये. तिच्याशिवाय दीपिका आहे. तर तिच्याकडेही वेळ नाही. मला चैन्नई एक्सप्रेसप्रमाणे एक चित्रपट करायचा आहे. ती हिरोईन वयाने खुप लहान असेल पण, मी आत्ताच चित्रपटातील स्टारकास्ट सांगू शकणार नाही.काही जणांसोबत मी बोललो आहे. मी खरंच यावेळी करिनाला मिस करतो आहे. पण ती सध्या प्रेगनंन्ट असल्याने तिच्याकडून चित्रपटाची अपेक्षा करूच शकत नाही.’