Join us
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल अॅवॉर्ड मिळाला तर आनंदाच होईल- आलिया भट्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 12:46 IST

मात्र आलिया म्हणाली जर मला हा पुरस्कार मिळाले तर माझ्यासाठी तो सर्वात आनंदाचा क्षण असणार आहे. आता मला माहिती ...

मात्र आलिया म्हणाली जर मला हा पुरस्कार मिळाले तर माझ्यासाठी तो सर्वात आनंदाचा क्षण असणार आहे. आता मला माहिती नाही नक्की हा पुरस्कार मला मिळणार आहे की नाही मात्र जर मिळालाच तर त्याचा मला आनंदच असेल आणि मिळाला नाही तर त्यांनी मी निराश किंवा दु:खी होणार नाही आहे असे ही आलिया म्हणाली. पुढे ती म्हणाली मी कधीच पुरस्कारासाठी काम नाही करत पण जेव्हा मला एखाद्या चित्रपटातील अभिनयासाठी पुरस्कार मिळतो तेव्हा मला नक्कीच त्याचा आनंद होतो.  स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटातून आलियाने लहान वयातच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. आलियाला कॉमेडी. अॅक्शन, रोमँटिक, बायोपिक अशा विविध प्रकारच्या भूमिका साकाराच्या आहेत. आलिया आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकून भूमिका निवडत असल्याचे तिने सांगितेल. सध्या आलिया तिचा आगामी चित्रपट ब्रदिनाथ की दुल्हनियाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचित्रपटात तिच्याबरोबर वरुण धवन मुख्य भूमिकेत आहे. आलिया आणि वरुन यांनी याआधीही चित्रपट एकत्र काम केले आहे. हम्प्टी शर्मा की दुल्हनियामध्ये वरुण आणि आलियाची केमिस्ट्री चांगलीच रंगली होती. ब्रदिनाथ की दुल्हनिया हा हम्प्टी शर्मा की दुल्हनियाचा सीक्वल आहे. 10 मार्चला वरुण आणि आलियाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.