Join us

आलिया भट्टने सोडले मौन, पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबतच्या लग्नाबाबत केला 'हा' खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 15:44 IST

रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी बॉलिवूडमधली हॉट सिझलिंग जोडी आहे. सध्या या लव्हबर्डसची सगळीकडे चर्चा आहे.

ठळक मुद्देसध्या आलिया भट्ट तिचा आगामी सिनेमा गली बॉयच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेएका मुलाखतीत रणबीर कपूरने रिलेशनशीपमध्ये असल्याचे कबूल केले

रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी बॉलिवूडमधली हॉट सिझलिंग जोडी आहे. सध्या या लव्हबर्डसची सगळीकडे चर्चा आहे. अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवर त्यांचा रोमान्स सुरु झाला. यानंतर प्रत्येक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात येतेय.  

सध्या आलिया भट्ट तिचा आगामी सिनेमा गली बॉयच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान तिला रणबीर कपूरशी लग्नासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर आलिया म्हणाली, ''मला वाटते लोकांनी आता लग्नाच्या विषयातून जरा ब्रेक घेतला पाहिजे. गतवर्षी दोन सुंदर लग्न आपण बघितली.'पुढे आलिया म्हणाली, सध्या फक्त सिनेमात काम करायला पाहिजे आणि पुढेच पुढे बघितले येईल.'' आलियाचे एकंदरित बोलणे ऐकून अजून काही दिवस तिच्या लग्नाची प्रतीक्षा आपल्याला करावी लागणार आहे असेच दिसतेय. 

आलिया व रणबीरच्या नात्यावर उघडपणे चर्चा सोनम कपूर व आनंद आहूजा यांच्या रिसेप्शन पार्टीत ते दोघे एकत्र पोहचले तेव्हापासून सुरू झाली. त्यानंतर एका मुलाखतीत रणबीर कपूरने रिलेशनशीपमध्ये असल्याचे कबूल केले. मात्र कोणाचे नाव सांगितले नाही. आलिया व रणबीरचे नाते कपूर कुटुंबाने मान्य केले आहे. हेच कारण आहे की, आलिया अनेकदा कपूर कुटुंबासोबत दिसली आहे. अगदी अलीकडे आलियाने कपूर कुटुंबासोबत न्यू ईअर साजरे केले. याआधीही अनेकदा आलिया रणबीरच्या कुटुंबासोबत दिसली आहे.  

‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाबाबत बोलायचे झाले तर यात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला भाग नाताळ २०१९ मध्ये रिलीज होणार आहे. या आगामी सिनेमात रणबीरचा अ‍ॅक्शन अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर