Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आलिया भट्ट म्हणते, हिट होण्यासाठी मला कुठल्याही सुपरस्टारची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2017 11:54 IST

‘मुझे हिट होने के लिए किसी सुपरस्टार की जरूरत नहीं...’ होय, हे म्हणणे आहे, आलिया भट्ट हिचे. एका पाठोपाठ ...

‘मुझे हिट होने के लिए किसी सुपरस्टार की जरूरत नहीं...’ होय, हे म्हणणे आहे, आलिया भट्ट हिचे. एका पाठोपाठ एक अशा चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकणारी आलिया सध्या मेघना गुलजारच्या  ‘राझी’ या चित्रपटात बिझी आहे. यात आलियाच्या अपोझिट आहे तो, विकी कौशल.आलियाने यापूर्वी शाहरूख खान, शाहिद कपूर अशा सुपरस्टारसोबत काम केले आहे. अशात आलियाने विकी कौशलसोबत काम करणे, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेले. अलीकडे आलियाला याचबद्दल विचारण्यात आले. विकी कौशलसोबत काम करण्याचा निर्णय सोपा होता की कठीण? असा प्रश्न तिला केला गेला. यावर आलिया काय म्हणाली माहितीयं? आलियाने सर्वप्रथम विकीची मनापासून प्रशंसा केली. विकी कौशल माझ्यापेक्षा कित्येकपट अधिक प्रतिभावान अभिनेता आहे. कुणाला कमी लेखण्याचा प्रश्नच नाही. कारण आम्ही सगळे इथे स्वत:तील सर्वोत्तम देण्यास आलो आहोत. आपला येणारा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा अधिक चांगला असावा, असे इंडस्ट्रीतील सगळ्यांनाच वाटते, असे ती म्हणाली. अर्थात इथे ती थांबली नाहीच. याही पुढे ती बोलली. हिट होण्यासाठी मला कुठल्याही सुपरस्टारची गरज नाही. चांगली कथा आणि चांगले दिग्दर्शक यालाच मी महत्त्व देते. जी भूमिका करण्यात मजा येईल, अशीच भूमिका मी स्वीकारते. कारण माझा हाच चॉईस एक अभिनेत्री म्हणून मला पुढे नेणारा आहे, असेही ती म्हणाली.ALSO READ : आलिया भट्टच्या होकाराने सुखावला विकी कौशल!एकंदर काय मला हिट होण्यासाठी सुपरस्टारची गरज नाही, असे आलिया म्हणाली असली तरीही तिचे पाय अद्यापही जमिनीवर आहेत, हेच दिसते. विकी कौशलला स्वत:पेक्षा मोठा अभिनेता म्हणणे यातच सगळे आले.धर्मा मुव्हीज आणि जंगली पिक्चर्स निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राझी’ या चित्रपटात आलिया एका विवाहित महिलेची भूमिका साकारणार असून, पाकिस्तानी नवरीच्या भूमिकेत ती झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पंजाब, काश्मीर आणि मुंबई या तीन शहरांमध्ये होणार आहे.