आलिया भट्टने मागितला ‘किस’; वरूण धवनने दिला नकार! पाहा, एक इंटरेस्टिंग व्हिडिओ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 14:05 IST
अभिनेता वरूण धवनबद्दल सध्या एक विचित्र योगायोग पाहायला मिळतोय. होय, एकीकडे वरूण व त्याची गर्लफ्रेन्ड नताशा दलाल यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत. तर दुसरीकडे वरूणची आॅनस्क्रीन ‘लव्ह लेडी’ आलिया भट्ट हिची नाराजी ओढवून घेणारा वरूणचा एक व्हिडिओही वेगोन व्हायरल होतो आहे.
आलिया भट्टने मागितला ‘किस’; वरूण धवनने दिला नकार! पाहा, एक इंटरेस्टिंग व्हिडिओ!!
अभिनेता वरूण धवनबद्दल सध्या एक विचित्र योगायोग पाहायला मिळतोय. होय, एकीकडे वरूण व त्याची गर्लफ्रेन्ड नताशा दलाल यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत. तर दुसरीकडे वरूणची आॅनस्क्रीन ‘लव्ह लेडी’ आलिया भट्ट हिची नाराजी ओढवून घेणारा वरूणचा एक व्हिडिओही वेगोन व्हायरल होतो आहे. होय, ‘लव्ह लेडी’ आलिया भट्ट एका चुंबनासाठी आतूर आहे आणि वरूण मात्र तिला चक्क त्यासाठी नकार देतोय, असा हा व्हिडिओ आहे. आता या व्हिडिओचा मामला काय आहे, हे तुम्हाला कळायलाच हवे. तर हा व्हिडिओ कुण्या चित्रपटाचा सीन नाही तर एक जाहिरात आहे.होय, अलीकडे वरूण व आलियाने या जाहिरातीचे शूट केले. यात आलिया व वरूण या दोघांनी ‘आयकॉनिक’ रोमिओ-ज्युलिएट सीन जिवंत केला आहे. यात वरूण काही देसी संवाद म्हणतोय. (हे संवाद तुम्हाला ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ची आठवण करून देतील.) आलियाही त्याला प्रेमळ प्रतिसाद देतेय. वरूणच्या एका चुंबनासाठी ज्युलिएट बनलेली आलिया आतूर आहे. पण याचदरम्यान आलियाचा हातातील कचरा खाली फेकते आणि याने रोमिओ बनलेला वरूण पार दुखावला जातो. ‘When no litter in Pardes, then why kachra in Swades?’, असा प्रश्न तो आलियाला विचारतो अन् आलियाचा चुंबनाचा प्रस्ताव पार धुडकावून लावतो. खरे तर हा एक कमर्शिअल व्हिडिओ आहे. पण आलिया व वरूणसाठी मात्र तो पाहायलाच हवा. कारण, यात रोमिओ आणि ज्युलिएट बनलेल्या वरूण व आलियाला पाहणे कमालीचे इंटरेस्टिंग आहे. ALSO READ: वरूण धवनवर नाराज तर नाही गर्लफ्रेन्ड नताशा दलाल? बी-टाऊनमध्ये चर्चेला उधाणतूर्तास आलिया भट्ट ‘राजी’ या चित्रपटात बिझी आहे. यात ती विकी कौशलसोबत दिसणार आहे. याऊलट वरूण ‘आॅक्टोबर’ या चित्रपटात बिझी आहे. पुढीलवर्षी एप्रिलमध्ये वरूणचा हा चित्रपट रिलीज होतो आहे. वरूण व आलिया ही हिट जोडी करण जोहरच्या ‘सिद्दत’मध्ये दिसणार, अशीही बातमी आहे. अर्थात ही बातमी अद्याप कन्फर्म झालेली नाही. पण तोपर्यंत रोमिओ-ज्युलिएटच्या रूपातील वरूण व आलियाला तुम्ही पाहू शकता.