आलिया भट्ट आणि विकी कौशलच्या 'राजी'चे शूटिंग सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 16:44 IST
आम्ही तुम्हाला याआधीच सांगितले होते की लवकरच आलिया भट्ट आणि विकी कौशल एकत्र रोमांस करताना तुम्हाला दिसणार आहे. 'राजी'ची ...
आलिया भट्ट आणि विकी कौशलच्या 'राजी'चे शूटिंग सुरु
आम्ही तुम्हाला याआधीच सांगितले होते की लवकरच आलिया भट्ट आणि विकी कौशल एकत्र रोमांस करताना तुम्हाला दिसणार आहे. 'राजी'ची शूटिंग आजपासून सुरु झाली आहे. कारण जोहरने काही वेळापूर्वीच त्याच्या ट्विटवर 'राजी'च्या मुहुर्ताचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी एक कॅप्शनदेखील लिहिले आहे.''राजीचा प्रवास आजपासून सुरु होतो आहे यासाठी मेघना गुलजार, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांनी शुभेच्छा.'' आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मेघना गुलजारला या चित्रपटाचे शूटिंग काश्मीरमध्ये जाऊन रिअल लॉकेशनवर करायचे होते मात्र काश्मीरमध्ये बिघडलेल्या परिस्थितीमुळे तिला काश्मीरचा सेट मुंबईतच उभा करावा लागला. First Time :‘या’ चित्रपटात पाकिस्तानी विवाहित महिलेच्या भूमिकेत दिसेल आलिया भट्ट! मुंबई मिररच्या वृत्तनुसार चित्रपटात आलिया 20 वर्षीय तरुणीची भूमिका साकारते आहे. हा चित्रपटाची कथा एका पुस्तकावर आधारित आहे. राजीमध्ये आलिया उर्दूत बोलताना दिसणार आहे. कारण ती यात एका काश्मीरी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. जिचे लग्न एक पाकिस्तानी अधिकाऱ्याशी होते. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ती भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना देते. चित्रपटात आलियाच्या नवऱ्याच्या भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे. या आधी ही विकी आणि आलियाने एकत्र काम केले आहे. विकीने आपल्या करिअरची सुरुवात मसान चित्रपटातून केली आहे. यानंतर तो रमन राघव 2.0मध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. संजय दत्तच्या आयुष्यावर बनणाऱ्या चित्रपटातही विकी दिसणार आहे.